पुणे-राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज SSPMS कॉलेज येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास शहराध्यक्ष रमेश बागवे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. OBC च्या प्रश्नांवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आज राज्यव्यापी आंदोलन आयोजित केले होते. त्यानुसार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज RTO चौकात मोदी सरकारच्या विरोधात निदर्शेने करण्यात आली. यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘केंद्र सरकारने या देशामध्ये जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. लोकशाहीचे सर्व आधारस्तंभ त्यांनी खिळखिळे केले आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने OBC चे राजकीय आरक्षण रद्द केले. मोदी सरकारने न्यायालयापुढे OBC च्या आरक्षणाचा विषय योग्य रितीने न मांडल्यामुळे आज OBC समाजावर अन्याय झाला आहे. OBC हा बारा बलुतेदार व अठरा पगड जाती समाविष्ट असलेला समाज आहे. या समाजाला देशाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेण्यासाठीच आरक्षण देण्यात आले होते. परंतु आरक्षण रद्द झाल्यामुळे आज OBC समाजामध्ये प्रचंड नाराजगी आहे. काँग्रेस पक्षाने नेहमी समाजातील सर्व घटकांना समाविष्ट करून घेण्याची भूमिका राबविली आहे. OBC च्या आरक्षणाच्या हक्कासाठी काँग्रेस पुढच्या काळात तीव्र आंदोलन करणार.’’

यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की, ‘‘OBC चे राजकीय आरक्षण जाण्यास केंद्र सरकार जबाबदार आहे. विधानसभेच्या माजी अध्यक्षांनी विधानसभेत ठराव करून OBC अहवालाची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. केंद्रातील BJP सरकारने OBC ना राजकारणातून नव्हे तर समाज जीवनातूनच संपविण्याचा डाव आखला आहे. केंद्र सरकारने केलेल्या चूकांमुळे OBC समाजाचे मोठे नुकसान झालेले आहे. काँग्रेस पक्ष OBC समाजाला न्याय मिळेपर्यंत लढा देणार.’’ यावेळी माजी महापौर कमल व्यवहारे, ॲड. अभय छाजेड, संजय बालगुडे, नगरसेवक अरविंद शिंदे, अविनाश बागवे, रविंद्र धंगेकर, रफिक शेख, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, गोपाळ तिवारी, वीरेंद्र किराड, मुख्तार शेख, सुनिल शिंदे, राजेंद्र शिरसाट, सोनाली मारणे, विशाल मलके, शाबीर खान, सुनील पंडित, प्रशांत सुरसे, चेतन आगरवाल, चैतन्य पुरंदरे, रमेश सकट, प्रवीण करपे, सचिन आडेकर, सौरभ अमराळे, रजिया बल्लारी, शारदा वीर, विनोद निनारिया, विजय वारभुवन, बबलु कोळी, रवि पाटोळे, क्लेमेंट लाजरस, मुन्नाभाई शेख, अविनाश अडसुळ, देविदास लोणकर, अनिस खान आदी उपस्थित होते.

