ज्ञान आणि रोजगार संदर्भात करार करणारे महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालयअद्ययावत अभियांत्रिकी तंत्रज्ञान शिकण्यासाठी होणार मदत
पुणे : भारतातील सर्वात मोठे अभियांत्रिकी उत्पादन आणि बांधकाम समूह म्हणून ओळखली जाणारी लार्सन अँड टुब्रो कंपनी भारतातील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान कौशल्याला अद्ययावत ठेवण्यासाठी कार्यरत असून त्यांच्या एल अँड टी एज्युटेक व ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यात अद्ययावत ज्ञान व रोजगार संदर्भात करार झाला आहे. हा करार करणारी ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय ही महाराष्ट्रातील व भारताच्या पश्चिम विभागातील पहिली संस्था आहे. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान शिकण्यास मदत होणार आहे.
ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सागर ढोले पाटील, सचिव उमा सागर ढोले पाटील यांचे कराराकरिता मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम प्रसंगी लार्सन अँड टुब्रोचे मार्केटिंग हेड संजीव शर्मा तसेच संस्थेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
संस्थेचे प्राचार्य डॉ. निहार वाळिंबे यांनी सर्वांचे स्वागत करून सामंजस्य कराराबाबत माहिती दिली. डॉ. बी.एम. शिंदे यांनी या कार्यक्रमाचे आभार मानले.
ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय व एल अँड टी एज्युटेकमध्ये सामंजस्य करार
Date:

