सोमय्या ग्रेट पण , पुणे पोलिसांच्या भूमिकेबाबत उत्सुकता … ?
उमरगा- पुण्यात राहून असंख्य राज्यातून देशभर आपले फसवणुकीचे जाळे पसरवलेला महेश मोतेवार ला अखेर भाजपचे किरीट सोमय्या यांनी प्रामाणिकपणे सातत्यपूर्वक केलेल्या पाठपुराव्यामुळे जेलची हवा खावी लागत असून याप्रकरणी,आत्ता कुठे सुरुवात झाली आहे… गुन्हेगाराला शिक्षा होईपर्यंत सोमय्या यांना मात्र हा लढा अजूनही पुढे द्यायचा आहे .. सोमय्या यांचे विविध स्तरातून कौतुक होत असले तरी पुणे पोलिसांच्या भूमिकेबाबत मात्र उत्सुकता लागून आहे .
फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या महेश मोतेवार याला गुरुवार (ता. 31) पर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावल्यानंतर आज सकाळी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मोतेवारच्या समवेत खाजगी सुरक्षारक्षक कसे होते ? आणि यांनी पत्रकारांना धक्काबुक्की केल्याने आता येथील पत्रकार वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. दरम्यान ज्या पुण्यातून गुरुकृपा मार्केटिंग नावाने आपला गोरख धंदा मोतेवारने सुरु केला त्या पुण्यातील पोलिसांची मोतेवारबाबत काय भूमिका आहे ? पुण्यात मोतेवार विरुध्द कोणते गुन्हे दाखल आहेत कि नाहीत ? असे प्रश्न निर्माण होत आहेत .
मोतेवार याने छातीत दु:खत असल्याचे नाटक केल्यामुळे त्यास उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.गुरूवारी सकाळी त्यास सोलापूरला हलवण्यात येत होते,तेव्हा उस्मानाबाद शहरातील टीव्ही आणि वृत्तपत्राचे पत्रकार न्यूज कव्हर करण्यासाठी रूग्णालयाच्या आवारात थांबले असता,महेश मोतेवार यास आयसीयुमधून अॅम्बुलन्समध्ये नेत असताना न्यूज चॅनलच्या कॅमेरामननी शुटींग सुरू केली,तेव्हा मोतेवारचा खासगी सुरक्षा रक्षक शहानूर काझी (वय – २७, रा.बिबेवाडी,पुणे) हा झी २४ तासचे रिपोर्टर महेश पोतदार आणि टीव्ही ९ चे रिपोर्टर संतोष जाधव यांना धक्काबुक्की करून अरेरावीची भाषा वापरली.त्यानंतर पोतदार यांनी काझी यास पकडून उस्मानाबाद शहर पोलीसांच्या ताब्यात दिले.त्यानंतर पोतदार आणि जाधव यांच्या तक्रारीवरून शहानूर काझी याच्याविरूध्द उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात ३२३,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पत्रकारांना झालेल्या धक्काबुक्की आणि अरेरावीचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने तिव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.त्याचबरोबर पोलीस अधीक्षक आणि गृह राज्यमंत्री यांना निवेदन पाठवून काझी याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
“समृद्ध जीवन‘चा सर्वेसर्वा महेश मोतेवार ला उस्मानाबाद गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (ता. 28) पुण्यातून ताब्यात घेतले होते तात्यासाहेब शिवगौंडा पाटील (रा. नागाव, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी शिवचंद्र सायबण्णा रेवते (रा. येणेगूर, ता. उमरगा), सरोजा शिवचंद्र रेवते (रा. पुणे), प्रमोद पुजार (रा. पुणे) व महेश किशन मोतेवार (रा. पुणे) या चौघांविरुद्ध उमरगा येथील सहदिवाणी न्यायालयात तक्रार केली होती. न्यायालयाने चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर मुरूम (ता. उमरगा) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता; मात्र मोतेवार पोलिसांना सापडत नसल्याने मुरूम पोलिसांनी त्यांना फरारी घोषित केले होते. उस्मानाबाद गुन्हे शाखा पथकाने गेल्या सोमवारी दुपारी मोतेवार ला पुणे येथून ताब्यात घेतले.
दरम्यान आता मोतेवार ला जिथेजिथे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत त्या त्या ठिकाणांहून पोलीस ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वृत्त आहे.