- पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा अनोखा उपक्रम.
- पाच लाखाहून अधिक भाविकांनी घेतले व्हर्चुअल दर्शन.
- डिजिटल-आर्ट व्ही आर ई कडून पॉईंट क्लाऊड व लीडार तंत्रज्ञानाचा वापर.
पुणे-जुलै महिन्यातील संकष्टी ही अंगारकी चतुर्थी असल्याने सर्वच गणेशभक्तांना गणेश दर्शनाची आस होती. मात्र कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील सर्व गणेश मंदिरे बंद असलयाने भक्तांचा हिरमोड झाला. यावेळी काही भाविकांनी रस्त्यावरून मुखदर्शन घेण्यात समाधान मानले तर काही लोकांनी फेसबुक लाईव्ह वर आपल्या लाडक्या गणरायाचे दर्शन घेतले. मात्र बाप्पाच्या मंदिरात जाईन दर्शन घेण्याचा अनुभव घेण्यापासून मात्र भाविक वचिंत राहिले.
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराने मात्र भक्तांच्या या भावनेचा आदर करीत तंत्रज्ञानाचा वापर करीत एक अनोखा प्रयोग केला. व व्हर्च्युअल रिऍलिटी तंत्रज्ञानाचा वापर करून अंगारकी निमित्त मंदिरात केलेल्या आरासी चे थ्री डी स्कॅनिंग केले व ते भक्तांना त्यांच्या मोबाईल वर उपल्बध करून दिले. यामुळे भक्तांना घरबसल्या अगदी थेट गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्याचा व्हर्च्युअल अनुभव घेता आला. मंगळवारी सकाळीच ही लिंक व्हॉट्सअप वरून तुफान व्हायरल झाली व जगभरातील जवळपास ५ लाख हुन अधिक भाविकांनी अगदी प्रत्यक्ष दर्शनासारख्या दर्शनाचा लाभ घेतला. तंत्रज्ञानाच्या या अनोख्या वापराबद्दल दगडूशेठ हलवाई मंदिर ट्रस्ट चे व हे तंत्रज्ञान बनवणाऱ्या पुण्यातील व्हर्चुअल रिऍलिटी क्षेत्रातील नामवंत डिजिटल आर्ट व्हीआरई (http://www.digitalartindia.com/) संस्थेचे सर्वत्र कौतुक होत असून असंखय भक्तांनी सोशल मीडियावर त्यांचे आभार मानले आहेत व सध्याच्या कठीण कोविद काळात अशा तंत्रज्ञानाची गरज असल्याचे नोंदवले आहे. येणाऱ्या गणोशोत्सवात वेगवेगळ्या मंडळांनी देखील या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन व्हर्च्युअल दर्शनाची सोय केल्यास भक्तांना आनंद होईल अशाही बऱ्याच प्रतिक्रिया आल्या आहेत.
भक्ती आणि तंत्रज्ञानाच्या मिलनातून येणारा हा अनुभव घेण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा!
https://my.matterport.com/show/?m=MUfAYKKAFVs
—–
“पॉईंट क्लाऊड व लीडार तंत्रज्ञानाचा वापर करून केलेले हे स्कॅनिंग लोकांना आपापल्या स्मार्ट फोनवर थेट मंदिराच्या गाभाऱ्यात वावरण्याचा अनुभव देत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद असल्याने भाविकांसाठी हा खूप भावनिक अनुभव आहे. कालपासून आमच्या व्हर्चुअल संकेतस्थळाला जवळपास पाच लाखाहून अधिक भाविकांनी भेट दिली आहे. जवळ पास ५० हजार भाविकांनी एकाहून अधिकवेळा भेट दिल्याचे दिसले आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आज श्रीमंत दगडूशेठ गणपती थेट आपल्या घरामध्ये अवतरले आहेत. अंगारकी चतुर्थीला मंदिराच्या गाभा-यामध्ये विशेष आरास केली जाते. आजवर, ही आरास काचेतूनच पहायला मिळायची. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता गाभा-यातील आरास थेट पाहता येईल. इतकंच नाही, तर विविध बाजूंनी मूर्ती आरास बघताना, आपण थेट गाभा-यातच आहोत, असं वाटेल.”
अजय पारगे, संचालक, डिजिटल आर्ट वी आर इ
——-
“दगडूशेठ हलवाई गणपती हा समस्त पुणेकरांचे श्रद्धास्थान असून मंगळवारी येणाऱ्या अंगारकी चतुर्थीला या गणेशाचे दर्शन घेण्याची इच्छा प्रत्येक भाविकांची असते .सध्याच्या कठीण काळात सुजाण नागरिक म्हणून कोव्हीड नियमांचे पालन करणे व श्रींचे दर्शन मात्र भाविकांना मनोभावे घेता येणे असा दुहेरी उद्देश साध्य करायचा होता. तंत्रज्ञानाच्या मदतीने तो साध्य करता आला याचा आनंद आहे. यापुढच्या काळात देखील या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर भाविकांच्या दर्शनासाठी केला जाईल.”
अशोकराव गोडसे, अध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट

