गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सने अलिकडेच केलेल्या ‘ककून इफेक्ट ऑन होम अँड हेल्थ सिक्युरिटी’ या सर्वेक्षणात कोव्हिड १९ पश्चात आपल्या जीवलगांच्या आरोग्याबाबत पुणेकरांना वाटणाऱ्या काळजीवर टाकण्यात आला प्रकाश
गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असणाऱ्या गोदरेज अँड बॉयस कंपनीच्या गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सने अलिकडेच केलेल्या ‘ककून इफेक्ट ऑन होम अँड हेल्थ सिक्युरिटी’ या सर्वेक्षणात ही बाब पुढे आली आहे की ९०.५७ % पुणेकर त्यांच्या कुटुंबाला आणि घरांना आजारपण वा रोगापासून संरक्षण देण्याबाबत गंभीर आहेत. या अभ्यासातून असेही निदर्शनास आले आहे की सध्याच्या काळात शहरातील ५२.४६% लोक यूव्ही केस, स्टरलायझर्स यासारखी आरोग्य सुरक्षा साहित्याची खरेदी करतात. याआधी हेच प्रमाण केवळ २२.९५% इतके होते. आताच्या अनिश्चिततेच्या काळात आजारपण, रोग यापासून आपल्या घराचे, कुटुंबियांचे रक्षण करण्यासाठी पुणेकर किती सजग आणि गंभीर आहेत हे दिसून येते.
महामारीला आवर घालण्यासाठी सरकारने लॉकडाऊन आणिसुरक्षित सामाजिक अंतर पाळणे यासारखे उपायांची अंमलबजावणी केली. कडक निर्बंधांमध्ये हळूहळू शिथिलता आणली जात असताना आपल्या आरोग्य रक्षणाची जबाबदारी नागरिकांनी स्वतः घेणे गरजेचे बनत चालले आहे. घरात राहताना आणि कामासाठी घराबाहेर पडतानाही या प्रचंड संसर्गजन्य विषाणूला नेस्तनाबूत करण्यासाठी अतिरिक्त आरोग्य सुरक्षा उपाय अंगीकारणे अत्यावश्यक बनले आहे. कोव्हिडचा विळखा कमी करण्यासाठी आणि त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय जाहीर करण्याचे काम सगळी राज्य सरकारे करत असताना भारतातील गृह आणि व्यावसायिक ठिकाणी सुरक्षा सुविधा पुरवठादार म्हणून कार्यरत असणाऱ्या गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सने अलिकडेच केलेल्या ‘ककून इफेक्ट ऑन होम अँड हेल्थ सिक्युरिटी’ या सर्वेक्षणाचे निकाल जाहीर केले.
मिळालेल्या माहितीवरून असे लक्षात येते की महामारीच्या आधी घरातली सुरक्षा याबद्दल असलेल्या आपल्या कल्पनांना छेद गेला आहे. आधी ४३% पुणेकर आरोग्य आणि निरामय जीवन याला प्राधान्य द्यायचे; तेच प्रमाण आता ८४.०२% झाले आहे. घरामध्ये ‘स्वस्थ आणि सुरक्षित’ राहणे या संकल्पनेलाही विशेष महत्व आणि वेगळा आयाम लाभल्याचे या अभ्यासातून उघड झाले आहे. आधी ८८.८४% लोक घर ‘स्वस्थ आणि सुरक्षित’ राहणे या संकल्पनेचा अर्थ घराची मालमत्ता सुरक्षा याअर्थी लावायचे तर केवळ १५.१६% लोक याचा अर्थ आपल्या आरोग्याशी जोडायचे. परंतु, सध्याच्या काळाच्या संदर्भात, हाच अर्थ उलट झाला आहे. आता केवळ १२.७०% लोक या संकल्पनेचा अर्थ घर आणि घरातल्या मालमत्तेशी जोडतात तर बहुसंख्य ८७.३०% लोक याचा अर्थ निरामय आरोग्याशी जोडतात.
गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सचे उपाध्यक्ष मेहेरनोष पिठावाला यांनी या संशोधनाविषयी माहिती देताना असे सांगितले की महामारीचा आणि त्याचबरोबर आलेले निर्बंध आणि लॉकडाऊन यांचा भारतीयांच्या मनातील आरोग्य सुरक्षा या संकल्पनेवर काय प्रभाव पडला आहे याची यातून माहिती घेण्यात आली. “आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने भारतीयांच्या दृष्टीकोनात या महामारीमुळे कमालीचा बदल झाला आहे. घरात ‘स्वस्थ आणि सुरक्षित’ म्हणजे आपले घर आणि तिथे असलेली आपली संपत्ती, मालमत्ता यांचे संरक्षण आणि त्यातून मिळणारी मानसिक शांतता एवढाच मर्यादित राहिला नाही. तर आता या गोष्टीकडे वैयक्तिक आरोग्य आणि नीरामय जीवन या दृष्टीने बघितले जाऊ लागले आहे. या महामारीने नागरिकांमध्ये सुरक्षिततेच्या भावनेला अधिक परिमाण दिले आहे. या परिस्थितीने त्यांना स्वतःच्या घर आणि आरोग्य सुरक्षा उपायांकडे अधिक व्यापक लक्ष देण्यासाठी उद्युक्त केले आहे.”
या संशोधनातून घरमालकांनी सुरक्षिततेच्या मुद्द्याकडे सकारात्मक पद्धतीने बघायला सुरुवात केल्याचे दिसून आले आहे असे सांगून मेहेरनोष पिठावाला पुढे म्हणाले, “नव्या युगातील अत्याधुनिक आरोग्य सुरक्षा साधनांचा वापर करून आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. याआधी सुरक्षा आणि सावधानता यांचे महत्व आणि याबद्दल लोकांच्या मनात असलेली जागरूकता आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या योग्य साधनांची खरेदी याविषयी बऱ्यापैकी अनास्था होती. आपल्या सुरक्षिततेची जबाबदारी ही सरकार, प्रशासन किंवा निवासी कल्याण संस्था यांच्यावर म्हणजेच बाह्य घटकांवर आहे, आपण त्यांच्यावर अवलंबून आहोत अशी याआधी लोकांची मानसिकता होती. पण आता हळूहळू या मानसिकतेत बदल होत आहे. भारताची ‘सुरक्षेतील तूट’ यावर प्रकाश टाकण्याच्या आमच्या प्रयत्नांत आम्हांला हे आढळून आले आहे की नागरिक आता त्यांच्या घराच्या आणि आरोग्याच्या सुरक्षिततेकडे आधी अंतर्गत आणि मग बाह्य घटक याक्रमाने बघत आहेत. स्वतःच्या घराची, आरोग्याची जबाबदारी आधी आपल्या स्वतःवर आहे असा त्यांच्या दृष्टीकोनात बदल झाला आहे.”
गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सच्या अंदाजानुसार देशातील एकूण आरोग्य आणि गृह सुरक्षा बाजारपेठ आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी २०% सीएजीआरसह साधारण ४५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल आणि त्यायोगे गृह आणि आरोग्य सुरक्षा उत्पादनांची मागणी वाढेल.

