चार वर्षांच्या सैन्यदलातील सेवेचा मोदी सरकारचा निर्णय सैन्यदलाचे मनोबल खच्चीकरण करणारा – आ. संग्राम थोपटे

Date:


पुणे -शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ पुणे शहरातील सर्व विधानसभा मतदार संघात निषेध धरणे आंदोलन शहर काँग्रेसचे प्र. अध्यक्ष अरविंद यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे कॅन्टॉन्मेंट विधानसभा मतदार संघात ताडीवाला रोड, पंचशिल चौक येथे करण्यात आले. यावेळी नगरसेवक लता राजगुरू, रफिक शेख, हाजी नदाफ, संगीता तिवारी, सुजित यादव, मेहबुब नदाफ, मीरा शिंदे, डॉ. अनुप बेगी, इम्रान शेख, वैशाली रेड्डी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. संग्राम थोपटे म्हणाले की, ‘‘भाजपाच्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने तरुणवर्गाचा विश्वासघात केला असून सैन्यदलात भरती होऊन देशाची सेवा करणाऱ्या तरुणांचा स्वप्नभंग केला आहे. केवळ चार वर्षांची सैन्यदलातील सेवा करून या जवानांना पुन्हा बेरोजगारीत ढकलण्याचा मोदी सरकारचा हा ‘तुघलकी’ निर्णय आहे. नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीपूर्वी वन रँक, वन पेन्शनचा नारा दिला होता पण सत्तेत आल्यानंतर त्यांना या आश्वासनाचा विसर पडला आणि वन रँक, वन पेन्शनवरून नो रँक नो पेन्शन वर आले. हा सैन्यदलाचा मोठा विश्वासघात आहे. तसेच देशाच्या सुरक्षेशी तडजोड करणारा आहे. शेजारी देश चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तानचा असलेला धोका लक्षात घेता सैन्यदल अधिक सक्षम व आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज करण्याऐवजी अग्निपथ सारखी योजना राबवली जात आहे.’’-
यावेळी शहर काँग्रेसचे प्र. अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘अग्निपथ योजनेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांमध्ये विरोध केला जात असून सर्व सामान्य तरूणांना या योजनेचा तोटा सांगण्याचे काम प्रदेश काँग्रेस कमिटीने सांगितल्या प्रमाणे आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या अग्निपथ योजनेला विरोध केला जात आहे. सैन्यदलातील १७ वर्षांची सेवासुद्धा वाढवावी अशी शिफारस स्व. चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी केली होती. मोदी सरकारच्या या निर्णयाला देशभरातून तरुणांनी तीव्र विरोध केल्यानंतर आधी वयोमर्यादा वाढवली व नंतर आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. कोणाशीही विचारविनिमय न करता मनमानी पद्धतीने घेतलेला हा निर्णय सैन्यदलाचा व तरुणांच्या हिताचा नाही. अग्निपथ योजनेमुळे रोजगाराची संधी वाढेल असा सरकारचा दावा खोटा आहे. दरवर्षी ८० हजार जवानांची भरती केली जाते अग्निपथ योजनेत दरवर्षी ४० हजार जवानांची भरती केली जाणार आहे. यामुळे सध्या आपल्याकडे असलेल्या १४ लाख जवानांची संख्या कमी होऊन ६ लाखांवर येईल. सैन्यदलातील प्रशिक्षण ही कायम चालणारी प्रक्रिया असून केवळ सहा महिन्यांच्या प्रशिक्षणाने गुणवत्ता वाढेले हा दावाही चुकीचा आहे. ४ वर्षानंतर दुसरी नोकरी मिळेल असा सरकारचा दावाही हास्यास्पद आहे. देशात सध्या सर्वात जास्त तरुणांची संख्या असून बेरोजगारीसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. १७ वर्षांची सेवा करून निवृत्त झालेल्या ५ लाख ७० हजार जवानांनी नोकरीसाठी प्रयत्न केला त्यातील फक्त १४ हजार म्हणजे फक्त २ टक्के जवानांना नोकरी मिळाली हे वास्तव आहे. सैन्यदलासाठी अर्थसंकल्पातील तरतूदीत कपात करत मोदी सरकारने १७.८ टक्क्यांवरून १३.२ टक्के एवढी केली आहे. अग्निपथ ही योजना तरुण वर्गाचा विश्वासघात करणारी व भारताच्या सुरक्षेशी तडजोड करणारी असून ही योजना तात्काळ मागे घ्यावी अशी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची मागणी आहे.’’
पुणे शहरात पर्वती विधानसभा मतदार संघामध्ये ॲड. अभय छाजेड व आबा बागुल यांच्या नेतृत्वाखाली मार्केटयार्ड उत्सव बिल्डींग चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी ब्लॉक अध्यक्ष सतिश पवार, रमेश सोनकांबळे, अनुसया गायकवाड, ताई कसबे, नंदा ढावरे, ज्योती अरवेल आदी उपस्थित होते.
कसबा विधानसभा मतदार संघामध्ये शनिपार चौक, बाजीराव रोड येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, वीरेंद्र किराड, संजय बालगुडे, कमल व्यावहारे, रविंद्र धंगेकर, अजित दरेकर, मुख्तार शेख, गोपाळ तिवारी, नीता रजपूत, सचिन आडेकर, प्रविण करपे, सुनिल पंडित, सुरेश कांबळे, अंजली सोलापूरे, स्वाती शिंदे, सुभाष थोरवे, भोला वांजळे, चेतन आगरवाल, शाबीर खान, आयुब पठाण, गोरख पळसकर आदी आंदोलनास उपस्थित होते.
वडगांवशेरी विधानसभा मतदार संघामध्ये पर्णकुटी चौक, येरवडा येथे आमदार संग्राम थोपटे, प्र. अध्यक्ष अरविंद शिंदे, राजेंद्र शिरसाट, रमेश सकट, भुजंग लव्हेो, अरूण वाघमारे, राहुल शिरसाट, विल्सन चंदेलवेल, ॲड. भीवसेन रोकडे, बाबा नायडू, डॉ. रमाकांत साठे, सुरेश राठोड, अनिल अहिर, यासीन शेख, विठ्ठल गायकवाड आदी आंदोलनास उपस्थित होते.
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात झाशी राणी पुतळा, बालगंधर्व चौक येथे पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. पुजा आनंद यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
कोथरूड विधानसभा मतदार संघामध्ये महर्षी कर्वे पुतळा, कोथरूड येथे प्र. अध्यक्ष अरविंद, शिंदे, नगरसेवक, चंदूशेठ कदम, संदिप मोकाटे, राजू साठे, किशोर मारणे, अजित ढोकळे, भगवान कडू, शारदा वीर, रविंद्र माझिरे आदी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आबा बागुल, राणी भोसले, महेश वाबळे सह धनकवडी- सहकारनगर मध्ये 59 अर्ज दाखल

पुणे: धनकवडी- सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात आज सोमवार (ता. २९) दुपारी...

पुण्यात कॉंग्रेस +ठाकरेंची सेना, मनसे एकत्र

पुणे :महापालिका निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष...

पुण्यात पाच हजारांहून अधिक सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई:अमितेशकुमार

पुणे :महापालिका निवडणूक शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी...

शासकीय योजनेतील कर्ज उदिष्ट बँकांनी जानेवारी अखेर पूर्ण करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. २९: शासकीय योजनेअंतर्गत जिल्ह्यातील विविध बँकातील प्रलंबित...