राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली रामलीला मैदानावर आज आंदोलन…

नवी दिल्ली- गगनाला भिडणाऱ्या महागाईविरोधात काँग्रेस पक्ष आज सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल करणार आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील सर्व नेते आज दिल्लीतील रामलीला मैदानावर केंद्र सरकारविरोधात निदर्शने करणार आहेत. देशातील महागाईवर नियंत्रण आणण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात येणार आहे.कालपासून येथील आंदोलनाची तयारी पूर्ण झाली आहे , आता या आंदोलनाला सुरुवात होईल असे सांगण्यात येते आहे. .तत्पूर्वी जयराम रमेश यांनी माध्यमांशी संवाद साधला , ते म्हणाले मोदी सरकारचे २ भाऊ आहेत बेरोजगारी आणि महागाई ; तसेच त्यांच्या जोडीला आहेत इडी आणि सीबीआय …