मोदी सरकारने ७ वर्षात देश केला भकास… – रमेश बागवे

Date:

 पुणे-    गेल्या सात वर्षात केंद्रातील मोदी आणि भाजपच्या सरकारने देश भकास करून टाकला असा आरोप पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी येथे केला .

केंद्रातील मोदी सरकारच्या ७ वर्षाच्या अपयशी कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी काँग्रेस पक्षाने आज राज्यात सर्व ठिकाणी धरणे आंदोलन केले. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे काँग्रेस पक्षातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बाळासाहेब शिवरकर, आबा बागुल,अविनाश बागवे, अरविंद शिंदे,कमल व्यवहारे, संजय बालगुडे,, सचिन साठे, रत्नाकर महाजन, , गोपाळ तिवारी, लता राजगुरू, रविंद्र धंगेकर, संगिता तिवारी, रफिक शेख, सुजाता शेट्टी, बाळासाहेब दाभेकर, राजेंद्र शिरसाट, प्रकाश पवार, राजू साठे, विशाल मलके, यासीन शेख, मनोहर गाडेकर, मेहबुब नदाफ, विठ्ठल गायकवाड, प्रशांत सुरसे, चेतन आगरवाल, भारत सुराणा, अरूण गायकवाड, मुन्नाभाई शेख, क्लेमेंट लाजरस, रॉर्बट डेव्हिड आदी सहभागी झाले होते. 

यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘केंद्रातील मोदी सरकारने ७ वर्षात जनतेची पिळवणूक केली आहे. अच्छे दिनचे स्वप्न व १५ लाखाचे अमिष दाखवून या जुमला सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. पंतप्रधान मोदींनी नोटबंदी करताना सांगितले की नोटबंदीमुळे भ्रष्टाचार थांबेल, पैशाचा काळाबाजाराला आळा बसेल व देशातील दहशतवाद संपुष्टात येईल. वास्तविक पाहता असे काही झाले नाही. याउलट देशाची अर्थ व्यवस्था ढासळली. गेल्या ७ वर्षात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीत मोदी सरकारने दोनंदा डल्ला मारला. जीवनावश्यक वस्तूंची किंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पेट्रोल, डिझेल व गॅसचे दराने उच्चांक गाठला आहे. सुरूवातीपासूनच कोरोना संसर्ग रोखण्यात मोदी सरकार अपयशी ठरले. त्यांच्या गाफिलपणामुळे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लाखो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. शेतकरी संघटनेशी कुठलीही चर्चा न करता बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांच्या विरोधी काळे कायदे केले. गेली अनेक महिने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर या काळ्या कायद्याच्या निषेधार्थ आंदोलने करीत आहेत परंतु पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून हुकूमशाही पध्दतीने नवीन शेतकरी कायद्याची अमंलबजावणी करीत आहे. देशाच्या १३० कोटी जनतेच्या लसीकरणाचे नियोजन न करता जगात आपले नावलौकिक करण्यासाठी ९३ छोट्या देशाला लस पुरविली. परीणाम आज देशाच्या जनतेला पुरेशी लस उपलब्ध नाही. ‘मोदी सरकारने ७ वर्षात न केला विकास, पण देश केला भकास’’.

      यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की, ‘‘की गेल्या ७ वर्षात मोदी सरकारने जनतेची अपेक्षा भंग केली. खोट बोला पण रेटून बोला हा मंत्र मोदी सरकार अतिशय प्रामाणिकपणे राबवित आहे. मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण दिशाहीन आहे. त्यांच्या चूकीच्या धोरणामुळे आतंरराष्ट्रीय पातळीवर देशाची नामुष्की झाली आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत प्रचार करताना मोदी म्हणाले होते की भाजप जर सत्तेवर आले तर दरवर्षी २ कोटी लोकांना रोजगार देणार. भाजप सरकार सत्तेवर आले परंतु रोजगार देण्याऐवजी युवा पिढी बेरोजगार झाली. मोदी सरकारचा कारभार म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सप्ने’’ आहे. फक्त आपल्या २ उद्योगपती मित्रांचीच संपत्ती वाढविली. मोदींनी आपल्या उद्योगपती मित्रांसाठी देश विकायला काढला आहे. रेल्वे, विमानतळे, बंदरे, बी.एस.एन.एल., पेट्रोलियम कंपन्या, बँका अशा सरकारी आस्थापना विकायला काढल्या आहेत ज्या जनतेची संपत्ती आहे.’’

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...