सत्तेचा गैरवापर करून देश तबाही कडे नेण्याचे काम मोदी सरकार करत आहे – कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा घणाघात

Date:


पुणे : दि १० -देशातील ‘सार्वजनिक उपक्रम व राष्ट्रीय संपत्ती’ नॅशनल मॅान्टायझेशन पाईपलाईन नावा खाली ‘खाजगी ऊद्योगपतींना’ बहाल करून देश तबाहीकडे नेण्याचे काम केंद्रातील मोदी सरकार करत आहे. भाजप पूर्वी ‘देश धोक्यात आहे, म्हणायचे आता मोदी धोक्यात आहेत(?)’ अशी वल्गना सुरू आहे.दोन वेळा मिळालेल्या सत्तेचा गैरवापर करून देश तबाही कडे नेण्याचे काम मोदी सरकार करत आहे असा घणाघाती आरोप कॉँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.  
राजीव  गांधी स्मारक समितीच्यावतीने ‘भारतात मोदी सरकारची लोकशाही की खासगीशाही’ या विषयावर ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे “ समारोपाचे – ६ वे  चर्चासत्र” घेण्यात आले. चर्चासत्राच्या अध्यक्षीय भाषणात नाना पटोले बोलत होते. या चर्चासत्रात जयंतराव माईणकर (जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक), सोहनकुमार बोस (कार्यांध्यक्ष – रेल्वे मजदूर युनियन, सेंट्रल रेल्वे) सहभागी झाले होते. 
नाना पटोले म्हणाले, खासगीकरणामुळे सर्वसामान्यांचे अधिकार संपुष्टात येतील.. इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयकरण करून सर्वसामान्य नागरिकांना बँकाचे दार उघडले तर आज मोदी सरकार बँकेत पैसे ठेवायला आणि बँकेतून पैसे काढायलाही पैसे मागत आहे. रेल्वे, विमानतळ, विमानसेवा, बँका, बंदरे, एलआयसी या सार्वजनिक उपक्रमांचे खासगीकरण करून सार्वभौम देशाचे स्वातंत्र्य संपुष्टात आणण्याचे प्रयत्न भाजपचे सुरू आहेत. आपल्या जीवापेक्षा देश महत्वाचा असे मानणारे पंतप्रधान आपल्या देशाने या पुर्वी पाहिले आहेत, पंतप्रधान पदाची गरिमा संपवयांचे काम मोदी करत असल्याची प्रखर टिका देखील श्री पटोले यांनी केली.
नॅशनल रेल्वे मजदूर संघाचे कार्याध्यक्ष श्री सोनलकुमार बोस म्हणाले, रेल्वेच्या विविध विभांगांचे खासगीकरण सुरू आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य सुविधा, रेल्वे स्वच्छता, तिकीट प्रिंटिंग अशा रेल्वेशी संबधित विविध बाबी नॉन कोअर मध्ये समाविष्ट करून खासगीकरण सुरू झाले आहे. आज रेल्वे देशाच्या कानाकोपऱ्यात सुविधा देते, उद्या खासगीवाले ग्रामीण किंवा दुर्गम भागत सेवा देणार का? या प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे. मग दुर्गम भागांचा विकास होणार कसा? पूर्वोत्तर भागात सैनिक कसे जाणार या प्रश्नाचे उत्तर सरकार देत नाही. रेल्वे तोट्यात आहे म्हणून सरकार त्यांचे खाजगीकरण करीत आहे. पण खाजगीकरण झाल्यावर ते तोट्यात रेल्वे चालवतील का? हा प्रश्न आहे. अन् जर आज रेल्वेचे खाजगीकरण झाले तर तो देशाला आणि भारतीयांना खूप मोठा धोका असणार आहे. रेल्वे वाचण्यासाठी म्हणजेच देशाच्या जीवन वाहीनी साठी नागरीकांनी देखील पुढे आले पाहीजे..
राजकीय विश्लेषक जयंतराव माईणकर म्हणाले, बाबाराव सावरकर यांनी लिहिल्या पुस्तकानुसार जर आपल्याला एखाद्यावर राज्य करायचे असेल तर मध्यवर्गीयांना गरीब करा अन् मोजक्या लोकांच्या हातात पैसा द्या. गेल्या 7 वर्षात हेच होताना दिसत आहे. याकाळात जर कोणी मोठे झाले असतील तर ते केवळ अंबानी आणि आदानी आहेत. नरसिंह रावांनी मनोरंजन व टेलिकॉमच्या क्षेत्रात खाजगीकरण आणले. मात्र हे सरकार “फायद्यात असलेल्या उद्योगांचे खाजगीकरण करत आहे तर तोट्यात असलेल्या उद्योगाचे नॅशनलायाजेशन” केले जात आहे. पुढील काळात तर हे उद्योग देखील पूर्णपणे बंदच करून टाकण्याची शंका आहे. ‘हिंदू मसीहा’ अशी इमेज असलेल्या मोदीजींनी नोटबंदी पासून – अलीकडच्या शेतकरी आंदोलनापर्यंत अनेक चुका केलेल्या आहेत. मात्र केवळ हिंदू वोट  बँकवर ते निवडणून येत आहेत. यांना थोपवण्यासाठी सर्व भाजप विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे. याची सुरूवात बंगाल आणि दिल्लीत झालेलीदिसून येते.. येणाऱ्या ५ राज्यात जनतेने या विषयी मतपेटीतून आवाज ऊठवणे गरजेचे व देश हिताचे आहे असे ही त्यांनी सांगितले..
खाजगीकरणासाठी मॅानिटायझेशन पाईपलाईन योजना जाहीर झाल्यावर, “भारतात, मोदी सरकारची लोकशाही का खाजगीशाही(?)” या विषयावर राजीव गांधी स्मारक समितीने सलग ५ चर्चासत्र मालीका घेतल्या.. त्यासर्व युट्यूब वर उपलब्ध असल्याचे समिती तर्फे सांगण्यात आले.. आभार प्रदर्शन स्मारक समिती सदस्य शशांक पाटील यांनी केले..

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...