पुणे -शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे भाजप सरकारच्या वतीने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती. सोनियाजी गांधी यांना ईडीची नोटीस देऊन चौकशीसाठी बोलविण्यात आल्याच्या निषेधार्थ प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने या आंदोलनाकरीता विभाग निहाय प्रमुख माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. सतेज पाटील, आ. डॉ. विश्वजीत कदम, आ. प्रणिती शिंदे यांच्याकडे जबाबदारी दिली होती. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी,माजी शहर अध्यक्ष आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी महापौर रजनी त्रिभुवन,ॲड. अभय छाजेड, वीरेंद्र किराड, संजय बालगुडे, कमल व्यवहारे, बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, आबा बागुल, लता राजगुरू, चंदूशेठ कदम, अजित दरेकर, राजेंद्र शिरसाट,संगीता तिवारी, मुख्तार शेख, अनिल सोंडकर, रमेश अय्यर, सुजित यादव, संगीता पवार, सचिन आडेकर, सतिश पवार, रफिक शेख,रमेश सकट, प्रदीप परदेशी, प्रवीण करपे, अरूण वाघमारे, साहिल केदारी, प्रकाश पवार, द. स. पोळेकर, शिलार रतनगिरी, नरसिंह आंदोली, भरत सुराणा, अमीर शेख, भुषण रानभरे, विठ्ठल गायकवाड, सचिन सावंत, सुमन इंगवले, अनुसया गायकवाड, नलिनी दोरगे, स्वाती शिंदे, सिमा महाडिक, स्वप्निल नाईक, सुरेश चौधरी, वाल्मिक जगताप, राजेंद्र नखाते, मेहबुब नदाफ, राजेंद्र नखाते, ऋषिकेश बालगुडे, राहुल वंजारी, बाळासाहेब प्रताप, चेतन आगरवाल, फिरोज शेख, नरेंद्र खंडेलवाल, सुरेश कांबळे, बबलू कोळी, गणेश शेडगे, शंकर ढावरे, शिलार रत्नागिरी, पपिता सोनावणे, सोनिया ओव्हाळ आदींसह मोठ्या प्रमाणावर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ‘‘भारतातील लोकशाही मुल्ये व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला धाब्यावर बसवून केंद्रातील मोदी सरकारचा हुकूमशाही कारभार सुरु असून विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा विशेषत: ईडीचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. देशातील भाजपा विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी व त्यांचा छळ करण्यासाठी या यंत्रणांचा गैरवापर सर्रास केला जात आहे. काँग्रेस अध्यक्षा मा. सोनियाजी गांधी यांची ईडीमार्फत होत असलेली चौकशी हा सुद्धा याच षडयंत्राचा भाग आहे. वास्तविक पाहता नॅशनल हेराल्ड प्रकरणात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. २०१५ साली बंद झालेले हे प्रकरण पुन्हा उकरून काढण्यामागे काँग्रेस पक्ष व गांधी कुटुंबाला नाहक त्रास देणे व त्यांचा छळ करण्याचा प्रकार आहे.’’
आ. सतेज पाटील डॉ. विश्वजीत कदम, आ. प्रणिती शिंदे व प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे आदी प्रमुख नेत्यांची यावेळी भाषणे झाली.
नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनियाजी गांधी यांची ईडीमार्फत केली जाणारी चौकशी ही राजकीय द्वेषातून केली जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणा या मोदी सरकारच्या कठपुतली बाहुल्या झाल्या असून सरकारच्या इशाऱ्यावर त्या केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच कारवाई करत आहेत. याच प्रकरणात याआधी राहुलजी गांधी यांचीही पाच दिवस दररोज १० – १० तास चौकशी करण्यात आली. आता सोनियाजी गांधी यांची चौकशी केली जात आहे. परंतु काँग्रेस पक्ष भाजपा व मोदी सरकारच्या या दडपशाहीला भीक घालत नसून आम्ही लोकशाही मार्गाने उत्तर देऊ.

युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या बेकायदेशीर ईडीच्या चौकशी विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. प्रातिनिधिक पुतळ्याचे दहन करून केंद्र सरकारचा कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदवला.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे व पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ नवले, प्रदेश चिटणीस अनिकेत नवले, पुणे शहर उपाध्यक्ष सौरभ अमराळे, स्वप्नील नाईक, राजू ठोंबरे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी अक्षय माने, प्रसाद वाघमारे, शालू चलवादी, सद्दाम शेख, रुपेश कांबळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शिवराज मोरे म्हणाले, “सोनिया गांधी यांनी देशातील गोरगरीब जनतेच्या हितासाठी कार्य केले आहे. अशा सोनियाजींना ईडीच्या माध्यमातून मानसिक त्रास देण्याचा, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होत आहे. या बेकायदेशीर चौकशीचा युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करतो. सोनिया गांधींच्या समर्थनार्थ देशभर आंदोलन केले जाणार असून, हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही.”

