मॉडर्न हायस्कूलमध्ये काव्यवाचन स्पर्धेला मोठा प्रतिसाद

Date:

पुणे – प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर,येथे आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त आंतरवर्गीय काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.कवितांचा आनंद कसा घ्यायचा हे आचार्य अत्रे यांनी महाराष्ट्राला शिकविले.त्यांनी संपादित केलेल्या नवयुग वाचनमाला आणि अरुणोदय वाचनमालेमुळे शाळकरी वयापासूनच विद्यार्थ्यांवर साहित्यसंस्कार झाले पण आज समाजात ताण-तणाव वाढत आहे. त्यावर हसण्यासारखा उपाय नाही. विनोदी कवितांनी ते साध्य होते. परंतु विनोदी कविता लिहिणे कठीण काम आहे. त्यासाठी सूक्ष्म निरीक्षण आवश्यक आहे. विनोदी काव्यवाचन स्पर्धेचा हा राज्यातील एकमेव प्रयोग आहे.प्रशालेतील पाचवी ते दहावीच्या 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला.अनेक विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता सादर केल्या. आभाळे ऋषिकेश शिवाजी, बच्छाव करण सचिन,बोडरे पवन शिवाजी या विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावली.या प्रसंगी मुख्याध्यापिका सांगिता लकारे,उपमुख्याध्यापिका रोहिणी काळे, पर्यवेक्षिका सीमा कुळधरण, उपस्थित होते. या काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन खंडू खेडकर, नवेश पाटील, शारदा साके यांनी केले.या उपक्रमाचे कौतुक प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे व सहकार्यवाह,नगरसेविका,पुणे महानगरपालिका महिला व बालकल्याण समिती सभापती प्रा.ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींना धमकी देणाऱ्या राज आमेरावर कारवाईची मागणी: काँग्रेसचे निषेध आंदोलन

पुणे: शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौकात निषेध...

आता २२ राज्यांमध्ये नागरिकत्व सिद्ध करावे लागणार,एसआयआर,बोगस मतदारांना वगळणार

पुणे (prab)- तब्बल २१ वर्षांनंतर नव्याने मतदार यादी तयार होणाऱ्...

पुण्यात एकाच वेळी मुळा, मुठा, खडकवासला धरणासह एकूण ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम

संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा...

भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई:भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची घोषणा

भिवंडी: भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात...