पुणे – गेल्या महापालिका निवडणुकीच्या अगोदर कात्रज मधील शिरोळे, कदम यांच्यानंतर आता होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीपूर्वी मनसेला झटका बसला तो रुपाली पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने, आता त्यानंतर रावडी नसलेल्या पण शिवाजीनगरच्या परिसरात सभ्यपणे हक्कासाठी लढाई लढणाऱ्या युवा नेत्याला मनसे मुकली आहे, मनसेचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ.अंजनेय साठे यांनी पदाधिकाऱ्यांसह कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मुंबईत टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, प्रणिती शिंदे, यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, रोहित टिळक यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. कॉंग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट आणि गौरव बोराडे यांनी या प्रवेशात मोलाची भूमिका बजावली. तरूण युवा कार्यकर्त्याला कॉंग्रेसने संधी दिली आहे.
शिवाजीनगर परिसरातील पाणीप्रश्नावर सातत्याने आवाज उठविणारे मनसे युवा नेते म्हणून अंजनेय यांच्याकडे पाहिले जात . सुशिक्षित आणि विविध स्वतरावरील वर्गात साठे यांचा असलेला सरळमार्गी ,अभ्यासू संपर्क कॉंग्रेसला बळ देणारा ठरेल असे नगरसेवक अविनाश बागवे यांनी म्हटले आहे.
‘माझ्या घरातच कॉंग्रेसची वैचारिक विचारसरणी आहे. माझे पणजोबा स्वर्गीय विनायक साठे हे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांच्या कार्याचा गौरव करत कॉंग्रेसकडून 1957 मध्ये त्यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाची संधी देण्यात आली होती. त्यांचाच वैचारीक वारसा घेऊन मी राजकारणात असून कॉंग्रेसकडून माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याला दिलेला मान सन्मान तसेच माझ्यावर दाखविलेला विश्वास मी निश्चितपणे सार्थ करून दाखविण’ – डॉ. अंजनेय साठे

