मुंबई- मनसे आणि भाजप युती होणार का असा प्रश्न समोर येत असतानाच याच प्रश्नाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिले असून राज ठाकरे परप्रांतीयांच्या धोरणात जोपर्यंत बदल करत नाहीत, तोपर्यंत युती शक्य नाही अशी भूमिका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.मनसे आणि भाजप युतीबद्दल बोलताना दानवे म्हणाले की, होणार या मुद्यावर बोलताना ते म्हणाले की लवकरच माझी आणि राज ठाकरे यांची भेट होणार आहे. ही भेट राजकीय असणार नाही, परंतु वेगळ्या विषयावर चर्चा होणार आहे. राज ठाकरे यांच्या भाषणावरून शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे, आता घरातूनच आवाज उठायला लागला असा कयास काढत त्यांनी शेलक्या शब्दात शिवसेनेवर टीका केली. हे सांगतानच त्यांनी राज ठाकरे हिंदुत्वाच्या दिशेने येत असल्याचेही निरीक्षण त्यांनी नोंदविले.
शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला जात आहे. पण सी टीम म्हणून हिनवले जात असलेल्या मनेसचे भाजपकडून कौतूक होत आहे. गडकरी यांनीही काळ ठाकरेंची भेट घेतली, त्यामुळे मनसे आणि भाजप युती होणार का असा प्रश्न समोर येत असतानाच याच प्रश्नाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिले

