पुणे-महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या पुणे शाखेचे उपाध्यक्ष, .रमेश प. परदेशी यांनी आयोजित केलेले नवोदित कलाकारांसाठीचे प्रशिक्षण शिबीर; दसऱ्याच्या मुहूर्तावर यशवंतराव चव्हाणनाट्यगृह कोथरूड,पुणे येथे संपन्न झाले. या शिबिराला महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष श्री. अमेयजी खोपकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष शशांक नागवेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी तसेच पुणे शहर कार्यकारिणी व पदाधिकारी उपस्थित होते.
या शिबिरासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून नगर, कोल्हापूर, सातारा, नाशिक, सांगली, सोलापूर, मुंबई व उपनगरांमधून सुमारे ७०० हून अधिक महाविद्यालियन, हौशी युवा कलाकारांची लक्षणीय उपस्थिती होती.
ह्या शिबिरामध्ये उपस्थितांना श्रीरंग गोडबोले, संजय जाधव, किरण यज्ञोपवीत आणि प्रवीण तरडे या मान्यवरांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले.
या प्रसंगी श्रीरंग गोडबोले यांनी तरुण कलाकारांना अभिनयासोबत लेखन, दिग्दर्शन, इ. क्षेत्रांमध्येही उत्तम करिअरच्या संधी मिळवता येतात असे सांगितले.
तर दिग्दर्शक संजय जाधव यांनी कोणतीही कारणे न देता कष्टपूर्वक आपण या क्षेत्रामध्ये उत्तुंग यश मिळवू शकतो असा विश्वास युवकांच्या मनामध्ये निर्माण केला. तसेच लेखक किरण यज्ञोपवीत यांनी विद्यार्थ्यांना संहिता लेखनासाठी आवश्यक तयारी कशी करावी यासंबंधी योग्य मार्गदर्शन केले.
शिबिराचा समारोप करताना शेवटच्या सत्रामध्ये लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावात नाट्यशिबिरे आयोजित व्हावी व ही नाट्यचळवळ अखंड प्रवाही राहावी यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे असे मत व्यक्त केले.
शिबिराच्या समारोप प्रसंगी कलाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या १४ कलाकारांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तर या क्षेत्रात काम करणाऱ्या
1) अक्षय टांकसाळे (फिल्म)
2) सुरेश विश्वकर्मा (फिल्म)
3) आस्ताद काळे (सिरीयल)
4) प्रदिप वैद्य (प्रायोगिक नाटक)
5) किरण माने (व्यावसायिक नाटक)
6) विनोद वनवे (राज्यनाट्य स्पर्धा)
7) विशाल चांदणे (प्रोडक्शन)
8) अनिल नगरकर (खलनायक, ख्वाडा)
9) संतोष राऊत (गिनीज रेकॉर्ड)
10) मेघराज राजेभोसले
11) विभावरी देशपांडे (ग्रीपस्)
12) मधूरा देशपांडे (सिरीयल)
13) जुईली वाणी (युवा निर्माती)
14) विनोद सातव (P.R.)
ह्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.




