9 मार्चला महापालिकेत येणार 10 स्वीकृत नगरसेवक

Date:

पुणे- महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळालेल्या,अगर थोड्या मतांनी पराभूत झालेल्या नाराज राजकीय कार्यकर्त्यांना त्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी त्यांचे डोळे स्वीकृत नगरसेवक पदाकडे लागलेले असताना आता महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिकेतील पक्षनेत्यांना या पदासाठी नावांची शिफारस करावी असे पत्र दिले आहे. स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. पुणे महापालिकेत १० स्वीकृत नगरसेवक असणार आहेत, त्यापैकी ७ जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. तर दोन जागा राष्ट्रवादीकडे तर एक जागा काँग्रेसकडे असणार आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे.ही स्पर्धा कमी करण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीची उमेदवारी दिली होती व त्यांचा पराभव झाला आहे त्यांना स्वीकृत म्हणून संधी मिळणार नाही अशी भूमिका भाजपच्या नेत्यांनी घेतली आहे. तरीही काही महत्त्वाच्या नेत्यांनी अपवाद म्हणून पराभूत उमेदवाराला संधी देण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसकडे मोठी स्पर्धा आहे.

पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी जोरदार प्रयत्न केले होते. पण तिकीट वाटपात अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाला. काहींचा पक्षाने एबी फॉर्म दिलेले असताना त्यांची उमेदवारी नाकारली, काहींची उमेदवारी मंत्र्यांचे नातेवाईक म्हणून नाकारली.तर काही जणांचा पत्ता आयात केलेल्या उमेदवारांमुळे कट झालेला आहे. या नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी पक्षाच्या नेत्यांकडून स्वीकृत नगरसेवक पदाचे आश्वासन अनेक कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे.

एकीकडे या पदासाठी राजकीय घडामोडी सुरु झालेल्या असताना महापालिका आयुक्तांकडून महापालिकेतील सर्व पक्ष नेत्यांना स्वीकृत नगरसेवक पदासाठी नावांची शिफारस करावी असे पत्र देण्यात आले आहे. ही नावे ९ मार्च रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत महापालिका आयुक्तांकडे सादर करावी लागणार आहेत. त्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत शिफारस केलेल्या नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यभरात हरवलेल्या ४८ हजार २७८ पैकी ३६ हजार ५८१ महिलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश

मुंबई- राज्यात गेल्या वर्षभरात तब्बल ४८ हजार २७८ अल्पवयीन...