अमोल बालवडकर अजितदादांच्या राष्ट्रवादीत…उमेदवारीही मिळाली.
माझ्या कठीण काळात अजित पवार यांनी माझ्यावरती विश्वास टाकला तर सार्थ ठरवेल – अमोल बालवडकर
पुणे – भाजपाने उमेदवारी नाकारल्या नंतर आज तातडीने माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि आजच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बालवडकर यांना उमेदवारी देण्यातही आली आहे .बालवडकर यावेळी म्हणाले,’हुकूमशाही चालत नाही कुठलाही पक्ष मोठा व्हावा मात्र पाय जमिनीवर ठेवावेत.माझ्या कठीण काळात अजित पवार यांनी माझ्यावरती विश्वास टाकला तो मी सार्थ ठरवेल .तसेच अमोल बालवडकर आता दाखवून देईल की भाजपाला कार्यकर्ता काय असतो. भाजपाला या निवडणुकीत धोबीपछाड देणार.. याला वचपा नाही याला धोका देणे म्हणतात. असे अमोल बालवडकर यांनी या वेळी माध्यमांशी बोलताना सांगितले
देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला नाही’, अमोल बालवडकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
बालवडकर म्हणाले, विधानसभेला देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिल्याने माघार घेतली. एक लाखाच्या मताधिक्याने चंद्रकांत पाटलांना निवडून आणलं. त्यानंतर भाजपाने माझ्या सोबत दगा फटका केला. मला दोन दिवस अगोदर जरी सांगितलं असतं तरी मी ऐकलं असतं. मात्र ऐनवेळी मला उमेदवारी नाकारली. मी दादांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता. तो शब्द पाळला गेला नाही. यामध्ये भाजप पक्षाचे नुकसान झाल आहे माझं नाही. मी राष्ट्रवादीत जाणार आहे. याचं नुकसान माझ्यापेक्षा जास्त भाजपला होणार आहे. याचा फटका भाजपाला बसेल.

