घायवळ परदेशात कसा पळून गेला याची जरा चौकशी करा – पत्रकारांनाच म्हणाले अजितदादा
पुणे- पुण्याच्या प्रदूषणाने पर्यावरणाची वाट लावली आहे पुण्याचं कारभारी म्हणून जे त्रिकुट आहे ते हटवा,पिंपरी चिंचवड,बारामती मी सुधारण्याचा प्रयत्न केला तसंच पुणे सुधारून दाखवेल असे सांगत अजितदादा पवार यांनी म्हटले कि,’ पुणे महापालिकेतील कारभाऱ्यांनी ठराविक लोकं डोळ्यापुढे ठेऊन टेंडर्स काढली, 9 वर्षात केवळ खड्डे बुजविणे, डागडुजी करण्याचे काम केले, ५ वर्षात आम्ही 1130 कोटी देऊनही केवळ 800 कोटी खर्च केले,महापालिकेतील कारभारी काम करायला कमी पडलेपुण्यात कित्येक कोटीची तरतूद करूनही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न झाले नाहीत.कात्रज कोंढवा रोड वर्षानुवर्षे झाली तरी पूर्ण करता आलेला नाही,24 बाय 7 पाणीयोजना पूर्ण करता आली नाही, नियोजनशून्य कारभार पुण्याच्या त्रिकुटाने केला त्यांना हत्वा आणि पुण्याची सत्ता माझ्या हाती देऊन पहा ,एकहाती सत्ता द्या, आमची प्रशासनावर पकड आहे. पुण्याचा पिंपरी चिंचवडप्रमाणे विकास करू”, असं आश्वासन अजित पवार यांनी मतदारांना दिलं
ते असेही म्हणाले ,'”भाजपच्या कारभाराला पुणेकर वैतागले आहेत. भाजपच्या कारभारावर पुणेकर राग, चीड व्यक्त करतील. पुण्याचे कारभारी बदला. त्रिकुटाकडे असलेली सत्ता माझ्याकडे द्या. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. पण पुण्याच्या कारभाऱ्यांकडे इच्छाशक्तीचा अभाव, पाठपुराव्याची क्षमता नाही”, अशी टीका अजित पवारांनी केली. “.
महापालिका निवडणुकीसाठी कुख्यात गुंडांच्या घरातील सदस्यांना ‘घड्याळ’ चिन्हावर उमेदवारी मिळाल्यामुळे विरोधकांनी अजित पवारांना लक्ष्य केले . यावर आज अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत, गुन्हेगाराने मर्डर केला तर त्याचं खानदान दोषी नसते, गुन्हेगारांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यावरून होणाऱ्या टीकेवर अजित पवार यांनी अत्यंत रोखठोकपणे आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “जर एखाद्याने हत्या केली, तर त्याचे संपूर्ण कुटुंब त्याला जबाबदार आहे असे म्हणणे चुकीचे आहे. उद्या मी काही गुन्हा केला तर त्याच माझ्या पत्नीचा काय दोष आहे? माझा मुलांचा, मुलींचा किंवा सूनांचा काय दोष आहे? असं नाहीय. जर एखाद्याने हत्या केली तर त्याचं संपूर्ण खानदान त्याला जबाबदार आहे, असे म्हणण्याचे कारण नाही. ती विकृती असते. काही चुकीच्या गोष्टी असतात?” असे ते म्हणाले.
अजित पवार यांनी स्पष्ट केले की, संबंधित जागा ही आरपीआयचे सचिन खरात यांच्यासाठी सोडण्यात आली होती. सचिन खरात आणि सीताराम गंगावणे यांनी सांगितले की, त्यांचे अधिकृत चिन्ह पोहोचायला वेळ लागेल, त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ चिन्हाची मागणी केली. मी माझ्या मित्रपक्षाला जागा दिली आहे. तिथे कोणाला उमेदवारी द्यायची हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. मी माझ्या पक्षाचा अधिकृत उमेदवार तिथे दिलेला नाही.

