Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अपडेटर सर्व्हिसेस लिमिटेडतर्फे सेबीकडे डीआरएचपी सादर

Date:

पुणे-आपल्या ग्राहकांना एकात्मिक सुविधा व्यवस्थापन (“आयएफएम”) सेवा आणि व्यवसाय पाठबळ सेवा (“बीएसएस”) सादर करत संपूर्ण भारतात स्थान निर्माण केलेल्या भारतातील एक अग्रगण्य, केंद्रित आणि एकात्मिक व्यवसाय सेवा प्लॅटफॉर्म कंपनी असलेल्या अपडेटर सर्व्हिसेस लिमिटेड (“कंपनी”) ने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“डीआरएचपी”) बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (“सेबी”) कडे दाखल केला आहे.

F&S अहवालानुसार कंपनी भारतातील आयएफएम बाजारपेठेतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी असून तिच्याकडे उद्योगातील सर्वांत व्यापक सेवा योजना आहे. त्यामुळे ती बाजारपेठेतील एक अद्वितीय आणि वैशिष्ट्यपूर्ण कंपनी बनली आहे.

कंपनीने प्राथमिक समभाग विक्रीतून निधी उभारण्याची योजना आखली आहे. त्यात (i) ४,००० दशलक्ष (४०० कोटी) रुपयांपर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा नवीन इश्यू आणि (ii) १३,३००,००० पर्यंतच्या

(१.३३ कोटी) इक्विटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर आहे. इक्विटी शेअरचे दर्शनी मूल्य प्रत्येकी १० रुपये आहे.

कंपनीने फ्रेश इश्यूच्या निव्वळ उत्पन्नाचा उपयोग पुढील उद्दिष्टांसाठी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे- (i) कंपनीने घेतलेल्या १,३३० दशलक्ष (१३३ कोटी रु.) रुपयांच्या रकमेच्या काही कर्जांची परतफेड/पूर्वफेड; (ii) १,५५० दशलक्ष (१५५ कोटी रु.) रुपयांच्या भांडवली खर्चाच्या गरजांसाठी निधी देणे; (iii) इनऑर्गनिक उपक्रमांना ८०० दशलक्ष (८० कोटी) आणि (iv) सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी शिल्लक रक्कम.

इक्विटी शेअर्सच्या विक्रीच्या ऑफरमध्ये १३,३००,००० पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे – ६,६५०,००० पर्यंत टॅंगी फॅसिलिटी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कडून(“प्रमोटर ग्रुप सेलिंग शेअरहोल्डर”), इंडिया बिझनेस एक्सेलन्स फंड II कडून १,३३०,००० पर्यंत शेअर्स आणि इंडिया बिझनेस एक्सेलन्स फंड II ए कडून ५,३२०,०००  पर्यंत इक्विटी शेअर्स आहेत.

आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड, मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे आयपीओ इश्यूसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

बीएसएस विभागामध्ये, कंपनी तिची उपकंपनी मॅट्रिक्सद्वारे ऑडिट आणि अॅश्युरन्स सेवा देते. मॅट्रिक्सद्वारे कर्मचारी पार्श्वभूमी पडताळणी तपासणी सेवा देखील दिली जाते. कंपनीच्या उपकंपन्या डेनेव्ह आणि एथेना द्वारे विक्री सक्षम सेवा पुरविली जाते. उपकंपनी अॅव्हॉनद्वारे मेलरूम व्यवस्थापन सेवा सादर केली जाते.

F&S अहवालानुसार, ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ५.७% वाटा असलेली मॅट्रिक्स ही भारतातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात भारतातील १५.४ % मार्केट शेअरसह डेनवे ही या विभागातील सर्वात मोठी कंपनी आहे. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात मेलरूम व्यवस्थापन सेवा बाजारपेठेत १५.५% वाटा असलेली  एव्हॉन भारतातील बाजारपेठेतील एक प्रमुख अग्रणी आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...