पुणे :तरुणावर वार करुन,त्याचा खून करून त्याची ओळख पटू नये, म्हणून मृतदेह आडबाजूच्या शेतात टाकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २४२/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वडकी येथील टाकमाळ गट नं. ६११ मध्ये ३० मार्चपूर्वी घडला होता.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकमाळ येथे एकाचे एका बाजूला शेत आहे. ते स्वत: हॉटेल चालवितात.तेथील कामगारांना त्यांनी शेतातून लाकडे तोडून आणण्यास सांगितले होते.
कामगार शेतात गेले असताना त्यांना तेथे मृतदेह पडलेला दिसून आला. मृतदेह संपूर्ण सडलेल्या स्थितीमध्ये होता. कुत्र्यांनी त्याचे लचके तोडलेले होते. लोणी काळभोर पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविला.मानेवरील जखमेमुळे त्याचा मृत्यु झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिल्याने पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.त्याचे वय अंदाजे ३५ ते ४० असून मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. लोणी काळभोर पोलीस निरीक्षक काळे (मो. 8108777171) अधिक तपास करीत आहेत.
खून करुन शेतात टाकला तरुणाचा मृतदेह
Date:

