Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे OBD2 चे पालन करणारी 2023 अ‍ॅक्टिव्हा125 लाँच

Date:

नवी दिल्ली, २८ मार्च २०२३ – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने आज OBD2 चे पालन करणारी नवी 2023 अ‍ॅक्टिव्हा125 लाँच केली.

2023 अ‍ॅक्टिव्हा125 लाँच करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष श्री. अत्सुशी ओगाता म्हणाला, ‘एच- स्मार्ट व्हेरीएंटसह OBD2 चे पालन करणारी 2023 अ‍ॅक्टिव्हा125 लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे. ग्राहकांना सुखदपणे प्रवास करता यावा म्हणून आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेले आणि अद्ययावत नियमांचे पालन करणारे नवे मॉडेल लाँच केले आहे. एचएमएसएआयमध्ये आम्ही ग्राहकांचे आयुष्य उंचावणारी नाविन्यपूर्ण व शाश्वत वाहतूक उत्पादन उपलब्ध करण्यासाठी बांधील आहोत.’

2023 अ‍ॅक्टिव्हा125 लाँचविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे ऑपरेटिंग अधिकारी श्री. योगेश माथुर म्हणाले, ‘एच- स्मार्टसह करण्यात आलेले 2023 अ‍ॅक्टिव्हा125 चे लाँच ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी व नाविन्याप्रती असलेली आमची बांधिलकी दर्शवण्यासाठी कंपनीने टाकलेले लक्षणीय पाऊल आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही इतरांपेक्षा वेगळे, दर्जेदार आणि व्यवसायाला चालना देणारे उत्पादन उपलब्ध करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.’

नव्या 2023 अ‍ॅक्टिव्हा125 मध्ये OBD2 चे पालन करणारे होंडाचे विश्वासार्ह पीजीएम- एफआय इंजिन देण्यात आले असून त्याला एनहान्स्ड स्मार्ट पॉवरमुळे (ईएसपी) चालना मिळते.

अचूक आणि संवेदनशील असलेल्या एनहान्स्ड स्मार्ट पॉवरमुळे (ईएसपी) भारतात जागतिक दर्जाची सुविधा मिळणार आहे. इंजिनच्या कामगिरीला गती देणारे एन्हान्स्ड स्मार्ट पॉवर (ईएसपी) तंत्रज्ञान कार्यक्षम कंबशन विस्तारते व सायलेंट स्टार्ट आणि पर्यावरणपूरक इंजिनच्या मदतीने घर्षण कमी करते.

एनहान्स्ड स्मार्ट पॉवरमध्ये (ईएसपी) पुढील बाबींचा समावेश करण्यात आला आहे –

1.  अनोखे होंडा एसीजी स्टार्टर – यामुळे इंजिन झटक्याशिवाय सुरू होते व त्याच एसी जनरेटरच्या मदतीने रायडिंग करताना करंटनिर्मिती आणि बॅटरी चार्जिंग केले जाते. यामुळे पारंपरिक प्रकारची स्टार्टर मोटर वापरण्याची गरज राहात नाही व पर्यायाने गियर मेशिंगचा आवाज येत नाही.

दोन मेकॅनिकल वैशिष्ट्यांमुळे कमी प्रयत्नांत इंजिन सुरू होते – यातले पहिले म्हणजे डीकंप्रेशनचा कार्यक्षम वापर आणि किंचित उघडलेले एक्झॉस्ट व्हॉल्व्हज (कंप्रेशन स्ट्रोकच्या सुरुवातीला दिलेले) आणि त्यानंतर स्विंग बॅक सुविधा, ज्यामुळे इंजिन जरासे विरूद्ध दिशेला फिरते व त्यामुळे पिस्टनला रनिंग स्टार्ट मिळतो. पर्यायाने कमीत कमी उर्जेच्या वापराने इंजिन सुरू होते.

स्टार्ट सोलेनॉइड ऑटोमॅटिक चोक यंत्रणेप्रमाणे काम करून रिच एयर फ्युएल मिक्श्चरची खात्री करते आणि अगदी कोणत्याही वेळी एकाच प्रयत्नात स्टार्ट करणे शक्य होते.

वारंवार केला जाणारा वापर सुलभ व्हावा म्हणून होंडा एसीजी स्टार्टरमध्ये आयडलिंग स्टॉप सिस्टीम देण्यात आली आहे. आयडलिंग स्टॉप सिस्टीम ट्रॅफिकमध्ये आपोआप इंजिन बंद करते व इंधनाचा अनावश्यक वापर टाळला जातो. यामुळे उत्सर्जन कमी होते. थ्रॉटलला जरासा ट्विस्ट देऊन इंजिन सहजपणे सुरू करता येते. 

2.  प्रोग्रॅम्ड फ्युएल इंजेक्शन (पीजीएम- एफआय): इंजिनचा विशिष्ट डेटा आणि ६ बुद्धीमान सेन्सर्सकडून सतत मिळत असलेल्या फीडबॅकनुसार सिलेंडरमध्ये योग्य प्रमाणात इंधन भरले जाते. यामुळे उर्जेचा एकसलग पुरवठा केला जातो.

3.  टंबल फ्लोहोंडाने जगातील पहिले टंबल फ्लो तंत्रज्ञान इंटिग्रेटेड डाय- कास्टिंग प्रक्रियेतून तयार केले आहे. एनहान्स्ड स्मार्ट टंबल टेक्नोलॉजी (ईएसटीटी) इनलेट पोर्ट शेपचा पूर्ण वापर करते आणि रिव्हर्स फ्लो तंत्राच्या मदतीने कोणतेही अतिरिक्त घटक समाविष्ट न करता कंबशनची पातळी सुधारते.

4.  कमी घर्षण – ऑफसेट सिलेंडर, आटोपशीर वजनाचे क्रँकशाफ्ट आणि अचूक पिस्टन यामुळे इंजिनचे एकंदरीत घर्षण कमी होते. योग्य वजनामुळे इंधन कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते.

नव्या अ‍ॅक्टिव्हा125 मध्ये इंधनाची कार्यक्षमता वाढवणारे टायर्स बसवण्यात आले आहेत, जे  होंडाने नव्या टायर कंपाउंड तंत्रज्ञानासह खास तयार केले आहेत. साइड स्टँड विथ इंजिन इनहॅबिटरमुळे साइड स्टँड लावलेला असताना इंजिन सुरू होत नाही आणि सोयीस्कर व काळजीमुक्त राहून प्रवास करता येतो.

2023 अ‍ॅक्टिव्हा125 मध्ये डिजी- अनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे, ते एकूण प्रवास, वेळ, ईको इंडिकेटर आणि सर्व्हिस ड्यू इंडिटेकर तसेच इंधन कार्यक्षमतेशी संबंधित इतर माहिती देते.

जागतिक स्तरावर नावाजली गेलेली होंडा स्मार्ट की नव्या अ‍ॅक्टिव्हा125 मध्ये देण्यात आली आहे. होंडा स्मार्ट की सिस्टीमध्ये पुढील वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

1.    स्मार्ट फाइंड:स्मार्ट की मध्ये देण्यात आलेली आन्सर बॅक यंत्रणा वाहन शोधणे सोपे करते. होंडा स्मार्ट की वरील आन्सर बॅक बटन दाबल्यानंतर स्कूटरचे ठिकाण दाखवण्यासाठी चार विंकर्स दोनदा उघडझाप करतात.

2.    स्मार्ट अनलॉक: स्मार्ट की यंत्रणा नवे तंत्रज्ञानयुक्त वैशिष्ट्य आहे, ज्यामध्ये प्रत्यक्ष किल्ली न वापरता वाहन लॉक आणि अनलॉक करणे शक्य होते. सिस्टीम सक्रिय केल्यानंतरचे २० सेकंद काहीही क्रिया घडली नाही, तर स्कूटर आपोआप बंद (डीअक्टिव्हेट) केली जाते.

3.    स्मार्ट स्टार्टजर स्मार्ट की वाहनापासून दोन मीटरच्या टप्प्यात असेल, तर रायडर सहजपणे लॉक मॉडवरील नॉब फिरवून इग्निशन पोझिशनला आणू शकतो आणि किल्ली न बाहेर काढता स्टार्ट बटन दाबू शकतो.

4.    स्मार्ट सेफ – अ‍ॅक्टिव्हा125 मध्ये स्मार्ट ईसीयू देण्यात आला आहे, जो सुरक्षा उपकरणाप्रमाणे ईसीयू आणि स्मार्ट की यांच्यातील इलेक्ट्रॉनिकली मॅचिंगप्रमाणे (आयडी) काम करतो व पर्यायाने वाहनाची चोरी होण्यापासून प्रतिबंध होतो. स्मार्ट की मध्ये इममोबिलायझर यंत्रणा देण्यात आली आहे, जी नोंदणीकृत नसलेली किल्ली वापरून इंजिन सुरू करण्यास प्रतिबंध करते. स्मार्ट की च्या सिक्युअर कनेक्शनशिवाय इममोबिलायझर यंत्रणा सक्रिय होत नाही.

5.    इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विच – दुहेरी काम करणारा स्विच खालच्या बाजूला दाबल्यास इंजिन सुरू होते, तर वरच्या बाजूला नेल्यास इंजिन बंद होते.

यामध्ये अनोखी टु लिड फ्युएल ओपनिंग यंत्रणा देण्यात आली आहे, जी रायडरला जास्तीत जास्त सोयीस्करपणा आणि विश्वासार्हता देते. यातील १८ लीटरची स्टोअरेजची जागा नव्याने तयार करण्यात आली आहे व त्यामुळे हेल्मेट ठेवूनही थोडी जागा उरते.

एच- स्मार्ट व्हेरिएंटमध्ये लॉक मॉड देण्यात आला आहे, ज्यात प्रत्यक्ष किल्लीचा वापर न करता एकाच सुविधेअंतर्गत ५ सुविधांचा (हँडल लॉक करणे, इग्निशन बंद करणे, इंधनाच्या टाकीचे झाकण उघडणे, सीट उघडणे आणि इग्निशन सुरू करणे) लाभ घेता येतो.

पासिंग स्विचमुळे एकाच स्विचवर सिग्नल पास करतहाय बीम/लो बीम सहजपणे नियंत्रित करता येते

होंडा अ‍ॅक्टिव्हा125 मध्ये प्रशस्त ओपन फ्रंट ग्लोव्ह बॉक्स देण्यात आला आहे, ज्यामुळे स्टोअरेजसाठी अतिरिक्त जागा मिळते.

नव्या अ‍ॅक्टिव्हा125 ची दणकट बांधणी विश्वासार्हता आणि टिकाऊपणाचे आश्वासन पाळणारी आहे. अ‍ॅक्टिव्हा125 वरील प्रत्येक प्रवास सुखद करण्यासाठी कॉम्बी- ब्रेक सिस्टीम (सीबीएस) इक्विलायझर आणि ३ स्टेप अडजस्टेबल रियर सस्पेन्शनमसह

देण्यात आली आहे. टेलिस्कोपिक सस्पेन्शनमुळे चांगल्या ग्राउंड क्लियरन्ससह आरामदायीपणे प्रवास करता येतो.

अ‍ॅक्टिव्हा125 मध्ये ट्युबलेस फ्रिक्शनलेस टायर्स देण्यात आले आहेत, जे दर्जेदार हाताळणीसह रायडरचा आत्मविश्वास उंचावतात. यामुळे पकड मजबूत राहाते व वाया जाणाऱ्या उर्जेचे प्रमाण कमी होते.

आकर्षक स्वरूप आणि अधिक चांगल्या दृश्यमानतेसाठी अ‍ॅक्टिव्हा125 मध्ये फुल एलईडी हेडलॅम्प आणि नव्याने स्टाइल करण्यात आलेले एलईडी पोझिशन लॅम्प देण्यात आले आहेत. आकर्षक पद्धतीने तयार करण्यात आलेला रियर लूक आणि ग्रॅबरेल तसेच खास डिझाइन करण्यात आलेली टेल यामुळे स्कूटरचे एकंदर डिझाइन उठावदार झाले आहे.

किंमत, प्रकार आणि रंग

अ‍ॅक्टिव्हा125 चार व्हेरीएट्संमध्ये (स्मार्ट, डिस्क, ड्रम अलॉय आणि ड्रम) आणि ५ रंगांत (पर्ल नाइट स्टार्ट ब्लॅक, हेवी ग्रे, मेटॅलिक) (ड्रम व्हेरीएंटमध्ये उपलब्ध नाही), रेबेल रेड मेटॅलिक, पर्ल प्रेशियस व्हाइट आणि मिड नाइट ब्लू मेटॅलिक उपलब्ध आहे.

2023 अ‍ॅक्टिव्हा125 व्हेरीएंट्स आणि किंमती
व्हेरीएंटएच- स्मार्टडिस्कड्रम अलॉयड्रम
किंमत(एक्स शोरूम दिल्ली)रू. 88,093रू. 86,093रू.82,588रू.78,920

जागतिक स्तरावर नावाजलेल्या होंडा स्मार्ट कीचा समावेश

होंडा स्मार्ट की सिस्टीमच्या मदतीने आनंद घ्या सोयीस्करपणाचा

स्टाइल उंचावणारा दर्जेदार सिग्नेचर एलईडी पोझिशन लॅम्प

चार प्रकारांत उपलब्ध – एच- स्मार्ट, डिस्क, ड्रम अलॉय आणि ड्रम

आकर्षक किंमत – रू. ७८,९२० (एक्स शोरूम दिल्ली)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...

यंदाचा रविकिरण फिरता सुवर्णचषक कल्याण – वरपच्या ‘सेक्रेड हार्ट स्कुल’ शाळेकडे!

'दिव्या खाली दौलत'ला द्वितीय तर 'रंग जाणिवांचे' तृतीय क्रमांकाने...