Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

लोकसंख्या नियंत्रित झाल्यास सामाजिक व आर्थिक स्थिरता येईलः प्रा. प्रकाश जोशी

Date:

पुणे, दि. २८ मार्च: “वर्तमान काळात लोकसंख्या वाढीचा भस्मासूर वाढत आहे. याला नियंत्रित करण्यासाठी विवाहाचे वय, साक्षरता, प्रेरणेचा अभाव, प्रोत्साहन, राजकीय इच्छाशक्ती व प्रसार माध्यमे यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. देशात लोकसंख्या नियंत्रित झाल्यास सामाजिक व आर्थिक स्थिरता येईल.” असे विचार एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक व लोकसंख्या अभियानाचे निमंत्रक प्रा. प्रकाश जोशी यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व मुंबई येथील इंटरनॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ पॉप्यूलेशन  सायन्सयांच्या संयुक्त विद्यमाने ‘पॉप्यूलेशन सिनेरियो ऑफ इंडियाः प्रेझेंट अ‍ॅण्ड फ्युचर’ या विषयावरील दुसर्‍या चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांनी आपले विचार मांडले.यावेळी डिपार्टमेंट ऑफ मायग्रेशन अ‍ॅण्ड अर्बन स्टडीजच्या प्रा. डॉ. अर्चना राय व डिपार्टमेंट ऑफ पॉप्यूलेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंटचे प्राध्यापक डॉ. आर. नागराजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्राध्यापक डॉ. मंदार लेले  व डॉ. गणेश काकंडीकर उपस्थित होते.
वरिल विषयाअनुसार डब्ल्यूपीयू व आयआयपीएस यांच्यामध्ये एमओयू करण्यात येणार आहे.
प्रा. प्रकाश जोशी म्हणाले,“लोकसंख्यावाढीबाबत सामाजिक व राजकीय पातळ्यावंर केवळ बोलले जाते. प्रत्यक्षात त्यांचा काहीही उपयोग होत नाही. लोकसंख्या वाढीचा हा भस्मासूर असाच वाढत राहिला तर २०५० पर्यंत भारतांची लोकसंख्या २०० कोटीपर्यंत जाऊन पोहचेल. त्यामुळे देशाला बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागेल. कुटुंब नियोजन या विषयाला अनुसरून सर्व स्तरांवर चर्चा होणे गरजेचे आहे.”
“कुटुंबनियोजनचा कार्यक्रम खेड्यापर्यंत पोहचविण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तसेच जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम राबविले जावे. वाढती लोकसंख्या हा देशाला भेडसावणारा प्रमुख प्रश्न आहे. परंतु दुर्देवाने त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. त्यामुळेच बेकारी, घरांची कमतरता, वाहतुकीची कोंडी, पर्यावरणाचा ह्यास, गुन्हेगारी या सारख्या समस्या या दिवसेंदिवस वाढत जाणार आहेत. या सर्व समस्यांना थांबविण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. या विषयाला अनुसरून सरकारला कडक पावले उचलावी लागतील. त्यासाठी कुटुंबात तिसरे अपत्य झाल्यास त्यांच्या सरकारी सवलती बंद कराव्यात. त्यात प्रामुख्याने धान्य किंमतीत सवलत, घरांसाठी सवलत, ग्रामपंचायत ते लोकसभा निवडूणक लढविण्याचा हक्क. इ. मिळणार नाही. विवाह संदर्भात निर्माण केलेल्या वयाच्या कायदयाचे काटेकोर पालन केले जात नाही. कुटुंबानियोजनाचा कार्यक्रम प्रत्येक खेड्यापर्यंत पोहचविण्यासाठी प्रसार माध्यमांचा उपयोग मोठ्या प्रमाणात करावा. कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी वीस हजार रुपये प्रोत्साहन रक्कम दिल्यास जननदर कमी होण्यास नक्कीच मदत होईल. साक्षरतेमुळे सुद्धा समाजात जागरूकता निर्माण होऊन कुटुंबनियोजनाला प्रोत्साहन मिळते. शिक्षणावर जीडीपीच्या ६ टक्के रक्कम खर्च करणे अपेक्षित आहे. सध्या शिक्षणावर जीडीपीच्या ३ टक्के खर्च होतो तो वाढविला पाहिजे.”
डॉ. अर्चना राय म्हणाल्या.“ लोकसंख्या वाढीबाबतची समस्या अफ्रिका आणि एशियामध्ये खूप प्रखरतेने जाणवत आहे.जिथे लोकसंख्या कमी आहे ते जवळपास सर्वच देश प्रगतशील क्षेत्रात मोडतात. अत्याधुनिक नियोजन करून चीन ने ज्या पद्धतीने लोकसंख्येला नियंत्रीत केले आहे तशी पद्धत या देशात राबविली जावी.”
डॉ. आर. नागराजन यांनी आपल्या विचारातून वाढत्या लोकसंख्येचे वाईट परिणाम, वेगवेगळे सर्वेक्षण, देशाच्या आर्थिक प्रगतीचे गुपिते, कृषि क्षेत्र यावर माहिती दिली. तसेच बुशरअप थेरी, डॉ. पॉल एर्लीरीच, ज्यूलियन सिमन यांनी लोकसंख्येवर केलेल्या अध्यायनाची माहिती दिली.
प्रा.डॉ. मंदार लेले यांनी प्रास्ताविकेत आधुनिक शिक्षण पद्धतीत जनसंख्या विषय किती महत्वाचा आहे हे सांगितले. तसेच एमआयटी डब्ल्यूपीयू व  इंटरनॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ पॉप्यूलेशन सायन्स यांच्या एमओयू होण्या संदर्भातील माहिती दिली.
सूत्रसंचालन व आभार प्रा.डॉ. मंदार लेले यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महावितरणने एका झटक्यात फेडले १२,८०० कोटींचे कर्ज

मुंबई, १ ४   डिसेंबर २०२५: देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी असलेल्या महावितरणने...

महापालिका निवडणुकीचा बिगुल सोमवार नंतर …

मुंबई- राज्यातील २९ महापालिकेत प्रशासक राज आहे. मात्र,...

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा...

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...