Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सावरकरांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींना सजा मिळालीच पाहिजे,विरोधकांनी सभागृहातून पळ काढला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Date:

मुख्यमंत्र्यांनी सभागृहात राहुल गांधींचा केला निषेध म्हणाले,’राहुल गांधी यांनी सेल्युलर जेलमध्ये राहून यावे .

मुंबई-आजही राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला. राहुल गांधी वारंवार सावरकरांचा अपमान का करतात? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.एकनाथ शिंदे म्हणाले, सावरकर हे देशाचे दैवत आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी यातना सहन केल्या. त्यामुळे राहुल गांधी यांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. आजही ते म्हणाले की, माफी मागायला मी सावरकर नाही. तर ते सावरकरांना समजता काय? असा सवाल विचारत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात राहुल गांधींचा निषेध व्यक्त केला.अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. यावेळी विरोधी पक्षांवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले विरोधकांनी उत्तर न ऐकताच सभागृहातून पळ काढला. काही लोक सभागृहाबाहेर स्टंट करण्यात मश्गुल आहेत. त्यांच्यात उत्तर ऐकण्याचे धाडस नाही, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला

.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राहुल गांधी यांनी सेल्युलर जेलमध्ये राहून दाखवावे.राहुल गांधी यांनी मोदींविरोधात वक्तव्य केले. राहुल गांधी यांना न्यायालयाने शिक्षा दिली आहे. त्याची अंमलबजावणी लोकसभा सभागृहाने केली. अजूनही ते तसे वक्तव्य करत आहेत. महाराष्ट्रातील जनता हे विसरणार नाही. त्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ज्या कायद्यामुळे राहुल गांधी निलंबित झाले. तो कायदा मनमोहनसिंग यांच्याच कार्यकाळात झाला आहे. त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्याचे कारण काय,

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, सर्वसामान्यांचे सरकार स्थापन होऊन नऊ महिने पूर्ण झाले आहे. पूर्ण काळ अधिवेशनं घेऊन विक्रमी कामकाज केले असून माध्यमातून व संवादातूनच जनतेचे प्रश्न सुटू शकतात लोकशाहीत चर्चा, संवादाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सुटू शकतात. पंचामृताच्या योजनांतून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे.

सर्वसमावेशक विकासाची संकल्पना

सर्वसमावेशक विकासाची संकल्पना घेऊन काम करीत असलेल्या या सरकारने पायाभूत सुविधा, कृषि, आरोग्य, सामाजिक न्याय, महिला, आदिवासी विकास, शिक्षण अशा विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद केली असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आमची विकासाची संकल्पना, प्रगतीचा विचार हा सर्वसमावेशक असून आमचे सरकार महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करणारे आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील १२ कोटींपेक्षा अधिक जनता आशावादी आहे.

बळीराजाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे

राज्यातील बळीराजावर संकट आले असून बळीराजाच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे आहे. अडचणीच्या काळात मदतीसाठी मागेपुढे बघणारे आम्ही नाही. त्यामुळेच कांदा उत्पादकांपासून अवकाळीग्रस्तांपर्यंत सगळ्यांना या सरकारवर विश्वास आहे. सरकार त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

डबल इंजिनमुळे विकासाचा वेग वाढला
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे सरकार अशी ओळख धडाकेबाज निर्णयांमुळेच मिळाली आहे, डबल इंजिनमुळे या राज्यात विकासाचा वेग वाढला आहे. विकासाची बुलेट ट्रेन सुसाट निघाली असून आहे. केंद्राने महाराष्ट्रासाठी विविध योजनांसाठी निधी देखील मोठ्या प्रमाणावर दिला आहे. सुमारे ३२ हजार ७८० कोटी केंद्र शासनाने महाराष्ट्राला दिले आहे. मुंबईतला एमटीएचएल प्रकल्प असो, किंवा कोस्टल रोड, मेट्रोची कामं, रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण अशा विविध पायाभूत सुविधांच्या कामांनी वेग पकडला आहे. मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन वर्षाअखेरीस होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्ग अधिक सुरक्षित करण्याचे नियोजन

भारतासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती दिली असून बीकेसीमध्ये जागा उपलब्ध करून दिली आहे. भारतातील या सर्वात पहिल्या बुलेट ट्रेनची सुरुवातही करू. मुंबई – नागपूर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महाराष्ट्र महामार्ग अधिक सुरक्षित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुंबईचं महत्त्व कमी होणार नाही

गेल्या काही वर्षात मुंबईचा रखडलेला विकास आणि खड्ड्यांची मुंबई ही ओळख पुसून मुंबईचे गतवैभव पुन्हा मिळवून द्यायचे आहे. बाहेर गेलेला मुंबईकर परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि यापुढेही राहील. मुंबईचं महत्त्व कमी होणार नाही. आम्ही ते कमी होऊ देणार नाही असे सांगत वर्षानुवर्षे रखडलेला पुनर्विकासाचा मार्गही मोकळा केल्यामुळे सेस बिल्डिंगमधील रहिवाशांना आता चांगली आणि हक्काची घरं मिळणार आहेत. मुंबईचे भूमिपुत्र असलेल्या कोळी बांधवांनाही त्यांचे कोळीवाडे आणि स्वतंत्र गावठाण यांचे सर्वेक्षण आणि सीमांकन करून हक्काची घरं मिळतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुंबई, मुंबई महानगर परिसरात मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती

मुंबईसारख्या महानगरामध्ये दळणवळणानंतर घरांचा विषयही जिव्हाळ्याचा आहे. आमचं सरकार आल्यानंतर केवळ मुंबईच नाही तर मुंबई महानगर क्षेत्रात देखील सिडको, म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती करतो आहोत, असे सांगून आजच्या पिढीला, तरुणांना काम करणारे सरकार हवे आहे, आणि आम्ही ‘परफॉर्म’ करीत आहोत. लोकांच्या मनातलं हे सरकार सर्वसामान्य लोकांसाठी अशीच दमदारपणे वाटचाल करीत राहील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचा दमदार टिझर

छत्रपती  शिवाजी महाराजांच्या  स्वराज्य उभारणीत  त्यांच्या  तेजस्वी पराक्रमासोबत  त्यांचे ...

येरवडा कारागृहात कैद्यावर फरशीने हल्ला

पुणे-येरवडा कारागृहात एका कैद्यावर फरशीने जीवघेणा हल्ला करण्यात आला...

मनीष रायते ठरला मुळशी केसरी २०२५चा मानकरी

मुळशी केसरी कुस्ती स्पर्धा २०२५ : मुळशीच्या आखाड्यात ऐतिहासिक...

Pcmc आयुक्त हेही युती सरकारच्या प्रचार मोहिमेचे प्यादे ? आप चा थेट प्रहार

आजचे लाभार्थी कंत्राटदार हे भाजपचे देणगीदार आहेत की सरकारच...