Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

जलयुक्त शिवार अभियान २.० जिल्ह्यातील १८७ गावात राबविण्यास जिल्हास्तरीय समितीची मंजुरी

Date:

पुणे, दि. २१ : शासनाचे महत्त्वाकांक्षी असे ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ जिल्ह्यातील १८७ गावात राबविण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. या अभियानांतर्गत मृद व जलसंधारणाच्या कामात शासकीय यंत्रणेने लोकसहभागाला प्राधान्य देण्याबरोबरच अशासकीय तसेच खासगी संस्थांचाही योग्य सहभाग घ्यावा, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत गाव निवडीसंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपजिल्हाधिकारी वनश्री लाभशेटवार, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजाता हांडे यांच्या समवेत जलयुक्त शिवार अभियान २.० जिल्हास्तरीय समितीतील सदस्य उपस्थित होते. सर्व उप विभागीय अधिकारी तसेच गटविकास अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

यावेळी डॉ. देशमुख म्हणाले, गाव आराखडा शासनाच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे तयार करावा. अभियानांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये शिवारफेरी करून पाणलोटनिहाय गावाचा आराखडा तयार करावा. हे अभियान जिल्ह्यात मोहीम स्तरावर राबवायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

अभियानासाठी निवडलेली १८७ गावे:
हवेली तालुका (१७ गावे): जांभळी, खेड, कोलवाडी, रामोशीवाडी, मांजरी खु., मांडवी बु., माणेखडी, मोगरवाडी, मोकरवाडी, शिवापूर, वांजळेवाडी, आर्वी तानाजीनगर, आगळंबे, कल्याण, खामगांव मावळ, घेरासिंहगड, खडेवाडी.
शिरूर तालुका (१७ गावे): चौधरवाडी (केंदूर), झगडेवाडी, महादेववाडी, माळवाडी आगरकरवाडी, पऱ्हाडवाडी, सुक्रेवाडी, मुखई, जातेगांव बु., पाबळ, खैरेनगर, धामारी, कान्हुर मेसाई, मिडगुलवाडी, शिक्रापूर, विठ्ठलवाडी, सविंदणे, थोरातवाडी (मलठण)
खेड तालुका (२० गावे): गोलेगांव, कासारी, कोहिंडे खु., परसूल, वाळद, वेव्हावळे, वाघू, येनिये खु., भोसे, वाफगांव, जऊळके बु., चिंचबाईवाडी, वरूडे, गाडकवाडी, कन्हेरसर, पूर, गोसासी, गुळाणी, वाकळवाडी, चौधरवाडी.
मावळ तालुका (१३ गावे): बेलज, नाणे, नानोली ना.मा, कुसगांव प.मा, जांभुळ, बेडसे, शिवाली, ओझर्डे, शिळींब, साते, इंगळुन, पिंपरी, डाहुली
जुन्नर तालुका (१२ गावे): बुचकेवाडी, धोलवड, डिंगोरे, डुंबरवाडी, घंगाळदरे, कुसुर, मालवाडी, नेतवाडी, उंब्रज, शिंदे, शिवली, धालेवाडी तर्फे मिन्हेर
आंबेगाव तालुका (१३ गावे): आपटी, कळंबई, कोंढवळ, गाडेवाडी, तेरुंगण, नानवडे, निमडाळे, मेघोली, मेनुंबरवाडी, वरसावणे, गिरवली, माळीण, काठापूर बुद्रुक
पुरंदर तालुका (१४ गावे): जाधववाडी, काळेवडी, कुंभारवळण, मुंजवडी, पठारवाडी, पवारवाडी, कोडीत ख., राजेवाडी, बांदलवाडी, चिवेवाडी, मिसाळवाडी, नाझरे कडेपठार, ढालेवाडी, सासवड
वेल्हा तालुका (४ गावे): अंत्रोली, पाबे, कोदवडी, सोंडे सरफल
मुळशी तालुका (६ गावे): कातवडी, मुगावडे, निवे, आंबेगाव, सालतर, चाले
भोर तालुका (६ गावे): म्हसर खु., भावेखल अंगसुले, कुरंगवाडी, नायगांव, गोरड म्हसवली, तळे म्हसवली
बारामती तालुका (३९ गावे): गुनवडी, मळद, कन्हेरी, डोर्लेवाडी, पिंपळी, ढेकळेवाडी, झारगडवाडी, कांबळेश्वर, सांगवी, शिरवली, काटेवाडी, माळेगांव खु., खांडज, निरावागज, मुर्टी, मासाळवाडी, मुढाळे, वढाणे, कुतवळवाडी, आंबी खु., भोंडवेवाडी, काळखैरेवाडी, चांदगुडेवाडी, बाबुर्डी, पानसरेवाडी, देऊळगांवरसाळ, नारोळी, कोळोली, दंडवाडी, सुपे, लोणीभापकर, काऱ्हाटी, माळवाडी, आंबी बु., पळशी, मोरगाव, तरडोली, अंजनगाव, सोनवडी सुपे
इंदापूर तालुका (११ गावे): पिटकेश्वर, निमगांव केतकी, गोतंडी, कळस, शिंदेवाडी, काझड, बोरी, शेळगांव, भरणेवाडी, कडबनवाडी, अंथुर्णे
दौंड तालुका (१५ गावे): ताम्हणवाडी, खुटबाव, नानगाव, पारगांव, पडवी, भांडगाव, डाळिंब, जिरेगाव, हिंगणीगाडा, वासुंदे, रोटी, कोठडी, मळद, नंदादेवी, बोरीऐदी
0000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धार्मिक ध्रुवीकरण आणि मतचोरी करणे हा भाजपाचा मुख्य फंडा – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

लोकशाही वाचवण्यासाठी पुणेकरांनी पुढे यावे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे...

विमान वाहतूक कोसळली: काय म्हणाले मंत्री मोहोळ

इंडिगोने पायलटच्या कामाची वेळ पाळली नाही: ४ सदस्यीय चौकशी...