सरकार विरहित सेवाव्रतींचा ओलावा हाच खरा धर्म -प.पू.स्वामी गोविंददेव गिरी महाराज

Date:

महा एनजीओ फेडरेशनतर्फे राज्यातील ५१ एनजीओंना मदतीचा हात
पुणे : कोविडसारख्या संकटाच्या काळात संपूर्ण जग हबकले, मात्र आपला देश ताठ मानेने उभा राहिला. मंदीच्या काळात देखील देश तग धरुन होता. राजकारणी मंडळी येतात आणि जातात, त्यांचे तसेच ठिक असते. असे असले तरी देखील जीवनमूल्यांचे महत्व देश कधीच विसरला नाही. जीवनमूल्य टिकविण्यातच राष्ट्राचे हित असून सरकारविरहित सेवाव्रतींचा ओलावा हाच खरा धर्म आहे, असे मत अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू.स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केले. महा एनजीओ फेडरेशनतर्फे विविध महा सेवा संकल्पांतर्गत विविध उपक्रमांचा शुभारंभ सोहळा मुकुंदनगरमधील झांबरे पॅलेस येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या ५१ वर्षे पूर्तीचे औचित्य साधून हे प्रकल्प सुरु करण्यात आले. फलटण येथील महा एनजीओ फेडरेशनच्या गोशाळेचे उद््घाटन, बुधवार पेठेतील महिलांना पोषण आहार वाटप, महाराष्ट्रातील ५१ एनजीओ यांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या उपयुक्त वस्तू, ग्रंथतुलेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना पुस्तक भेट अशा विविध सेवा प्रकल्पांचा शुभारंभ व प्रत्यक्ष वाटप देखील यावेळी झाले. गोविंददेव गिरी म्हणाले, विविध प्रकारे समाजात सेवा कार्य सुरु आहे, हे प्रत्येकाला कळणे महत्वाचे आहे. सेवेच्या क्षेत्रात झटणारे हात व पाऊले हेच या मातीचा कस आहेत. आज आपला देश पुनरुत्थानाच्या उंबरठयावर उभा आहे. संपूर्ण जग आपल्याकडे आदराने बघत आहे. आज भारत झोळी घेऊन फिरणारा नाही, तर देणारा देश म्हणून ओळखला जात आहे. या विकासासोबतच अंत:करणाचा विकास देखील व्हायला हवा. शेखर मुंदडा यांचे कार्य शिखरापर्यंत उंच असून त्यांच्यासारखी आणखी व्यक्तिमत्वे महाराष्ट्रात घडावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चित्रा वाघ म्हणाल्या, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून तळागाळात काम करणारे अनेक कार्यकर्ते आपल्याकडे आहेत. गरजू व पिडीतांचे आयुष्य व घर वसविण्याचे काम ते करीत आहेत. प्रत्येक घटकासाठी प्रत्येक पाऊलावर मदत करणा-या संस्था राज्यात असून त्यांची मूठ महा एनजीओ फेडरेशन व शेखर मुंदडा यांनी बांधली आहे. कोणत्याही कामाची सुरुवात सोपी असते, पण त्यामध्ये सातत्य ठेवणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. शेखर मुंदडा यांनी देखील मनोगत व्यक्त केले. महा एनजीओ फेडरेशन कार्यकारी संचालक ह.भ.प.अक्षयमहाराज भोसले यांनी महा एनजीओ फेडरेशनच्या कामाची विस्तृत माहिती देत समाज सेवकडे लोकांचा ओढा जावा  यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमासाठी महा एनजीओ फेडरेशन संचालक समिती व शेखर मुंदडा यांच्या परिवाराने विशेष मेहनत घेतली. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

फ्युएल शिक्षण संस्था समूह तर्फे वार्षिक कॉन्क्लेव्ह व फ्युचर स्किल्स समिट ६ फेब्रुवारी रोजी

पुणे, दि. ४ फेब्रुवारी: फ्युएल शिक्षण संस्था समूहातर्फे ‘वार्षिक...

फ्रॅक्टल अॅनालिटिक्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री 09 फेब्रुवारी 2026 पासून

·         फ्रॅक्टल अॅनालिटिक्स लिमिटेड (“कंपनी”)च्या प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति...

TCS BaNCS™ तैनात-जनता सहकारी बँकेमध्ये ग्राहकांना मिळणार नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाद्वारे सुधारित आणि जलद डिजिटलसेवा

बँकेच्या सर्व सेवा एकत्रित करणारी एक नवीन, आधुनिक प्रणाली प्रदान करण्यासाठी टीसीएस तिच्या प्रगत आणि पुरस्कार विजेत्या बँकिंग सॉफ्टवेअरचा वापर करेल. यामुळे बँकेला नवीन सेवा जलद सुरू करता येतील, ग्राहकांना चांगली सुविधा मिळेल आणि तिचे संपूर्ण बँकिंग ऑपरेशन्स डिजिटल करता येतील. पुणे, मुंबई, : जनता सहकारी बँक पुणे (JSBL) ने तिच्या आधीच्या बँकिंग प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी, कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि उत्कृष्ट ग्राहक सेवा प्रदान करण्यासाठी TCS BaNCS™ या जागतिक बँकिंग प्लॅटफॉर्मची निवड केली आहे. आयटी सेवा, सल्लागार आणि व्यवसाय उपाययोजना पुरवणारी, जागतिक पातळीवरील आघाडीची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (BSE: 532540, NSE: TCS), जनता सहकारी बँकेच्या ग्राहकांसाठी एक सुधारित बँकिंग अनुभव निर्माण करेल. TCS BaNCS चे आधुनिक डिजिटल चॅनेल ग्राहकांना बँकेच्या वेबसाइट, मोबाइल अॅप आणि ऑफलाइन शाखांमध्ये अखंड सेवा प्रदान करतील. TCS BaNCS ग्लोबल बँकिंग प्लॅटफॉर्मद्वारे समर्थित, जनता सहकारी बँक पुणे तिच्या बँकिंग प्रणालीमध्ये संपूर्ण परिवर्तन घडवून आणत आहे. यामध्ये कोअर बँकिंग, पेमेंट्स, ट्रेड फायनान्स आणि AML/KYC अनुपालनाचे आधुनिकीकरण यांचा समावेश असेल. बँकेचा उद्देश तिच्या वाढीला गती देणे, सर्व चॅनेलवर (मोबाइल, वेब आणि शाखा) उत्कृष्ट ग्राहक अनुभव प्रदान करणे आणि बाजारपेठेतील उपस्थिती मजबूत करणे आहे. या परिवर्तनामुळे बँकेची कार्यक्षमता वाढेल, कर्जाची गुणवत्ता सुधारेल आणि जोखीमांवर चांगले नियंत्रण येईल. शिवाय, या तंत्रज्ञानामुळे बँकेला सायबर सुरक्षा आणि डिजिटल बँकिंग मार्गदर्शक तत्त्वे यासारख्या रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमांचे पालन करण्यास सक्षम केले जाईल. जनता सहकारी बँक पुणेची स्थापना १८ ऑक्टोबर १९४९ रोजी झाली. पुण्यातील सहकारी संस्थांना पाठिंबा देण्यासाठी आणि समाजोपयोगी कल्याणकारी उपक्रम म्हणून सुरू झालेली ही बँक आता भारतातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील एक प्रमुख बँक आहे. आपल्या देशव्यापी नेटवर्कद्वारे, बँक व्यक्ती आणि लहान व्यवसायांना बचत खाती, कर्जे आणि आधुनिक डिजिटल सेवा देते. उत्कृष्ट ग्राहक सेवा प्रदान करण्यासाठी, बँक स्वतःचे डिजिटलीकरण करण्यासाठी आणि नवीन वैशिष्ट्ये सादर करण्यासाठी सक्रियपणे काम करण्यात आघाडीवर आहे. जनता सहकारी बँक पुणेचे सीईओ श्री जगदीश पी. कश्यप म्हणाले: "जनता सहकारी बँकेत, आमच्या ग्राहकांच्या आर्थिक गरजा समजून घेणे आणि त्यांना उत्कृष्ट बँकिंग अनुभव प्रदान करणे हे राहिले आहे. आमच्या डिजिटल प्रणालींचे आधुनिकीकरण करण्यासाठी आम्ही TCS BaNCS सोबत भागीदारी करून एक मोठे पाऊल पुढे टाकले आहे. या परिवर्तनामुळे आम्हाला आमच्या ग्राहकांना जलद आणि सोप्या डिजिटल सेवा प्रदान करता येतील. ग्राहकांची सुविधा हे आमच्या प्रत्येक कामाचे प्राधान्य राहावे हे आमचे उद्दिष्ट आहे." टीसीएसच्या फायनान्शियल सोल्युशन्स विभागाचे ग्लोबल हेड श्री. वेंकटेश्वरन श्रीनिवासन म्हणाले: "जनता सहकारी बँकेसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही भारतातील शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राला आधुनिक आणि सुरक्षित बँकिंग तंत्रज्ञान प्रदान करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत. आम्ही या बँकेसाठी एक आधुनिक प्रणाली सादर करत आहोत जी केवळ या क्षेत्राच्या अद्वितीय गरजा पूर्ण करत नाही तर जागतिक पातळीवरील सर्वोत्तम बँकिंग पद्धतींचा देखील समावेश करते. यामुळे ग्राहकांचा अनुभव वाढेल, नियामक अनुपालन सोपे होईल आणि बँकेला नवीन उत्पादने लाँच करण्यास आणि बाजारपेठेतील तिची स्थिती मजबूत करण्यास सक्षम केले जाईल." टीसीएसच्या सहयोगाने विकसित केलेल्या या नवीन प्रणालीमुळे  ग्राहकांना डिजिटल खाती उघडणे आणि स्वतःच्या बँकिंगचे (स्वयं-सेवा) व्यवस्थापन करणे खूप सोपे होईल. यामुळे बँकेचे कामकाज अधिक अचूक आणि जलद होईल आणि ग्राहकांना विविध आधुनिक सेवांचा फायदा होईल. स्केलेबल एपीआय-आधारित तंत्रज्ञान बँकेला बाजारपेठेतील बदलांशी त्वरित जुळवून घेण्यास सक्षम करेल, ग्राहकांना नेहमीच सर्वात आधुनिक आणि प्रगत बँकिंग वैशिष्ट्यांचा लाभ मिळेल याची खात्री करेल. याव्यतिरिक्त, बँक तिची ट्रेड फायनान्स ऑपरेशन्स पूर्णपणे डिजिटलाइज करण्यात सक्षम बनेल. यामुळे पैशाचे व्यवहार त्वरित होतील, जोखीम ओळखणे सोपे होईल आणि सरकारी नियमांचे चांगले पालन आणि देखरेख सुनिश्चित होईल. TCS...

बेन कॅपिटल समर्थित धूत ट्रान्समिशनतर्फे आयपीओसाठी सेबीकडे गोपनीय पद्धतीने अर्ज दाखल

ऑटो घटक उत्पादक धूत ट्रान्समिशन यांनी संभाव्य प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) च्या...