प्रसाद’ योजनेंतर्गत वैजनाथ ज्योतिर्लिंगचा प्रस्ताव केंद्रास पाठविणार

Date:

– पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई -केंद्र सरकारने तीर्थस्थळांच्या विकास व संवर्धनासाठी ‘प्रसाद’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय पर्यटन मंत्रालयास सादर करण्यात येईल, असे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य धनंजय मुंडे यांनी परळी येथील वैजनाथ ज्योतिर्लिंग स्थळाचा सर्वांगीण विकास व संवर्धनासाठी केंद्रीय पर्यटन विभागाच्या ‘प्रसाद’ योजनेत समावेश केला जावा, अशी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या ‘प्रसाद’ योजनेअंतर्गत परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश करण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव पर्यटन संचालनालयामार्फत जिल्हाधिकारी, बीड यांच्याकडून मागविण्यात आला आहे. त्यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर ‘प्रसाद’ योजनेमधील तरतुदी निकषानुसार तपासून उचित कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल, असेही मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सुभाष देशमुख यांनी सहभाग घेतला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...