पुणे- स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती लोणावळा-पुणे सायकल स्पर्धा हनुमंत चोपडेने 1 तास15 मिनिटात पूर्ण केली व प्रथम क्रमांक मिळवला. वसंत दादा सेवा संस्थेच्या वतीने 12 मार्च कै. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त लोणावळा पुणे सायकल स्पर्धा आयोजित करण्यात येते. यंदा स्पर्धेचे 33 वे वर्ष होते.
सकाळी 10.30वाजता लोणावळ्याचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी नगरसेवक राजू गवळी भाऊ शिर्के निखिल कवीश्वर अजय गवळी उपस्थित होते.
चोपडे व केदार पवार हे सुरुवाती पासून आघाडीवर होते त्यांच्या मागोमाग सिद्धेश्वर पाटील होता कामशेत ते देहू रोड वळणा पर्यंत दोघे बरोबर होते. तथापि हनुमंत चोपडे ने केदार पवारला मागे टाकले व 60 किं लो अंतर 1तास 15 मिनिटात पूर्ण केले केदार पवार ने दुसऱ्या क्रमांका मिळवत 1तास 20 मिनिटात स्पर्धा पूर्ण केली. तर सिद्धेश पाटील येने तिसरा क्रमांक मिळवत स्पर्धा 1तास30 मिनिटात पूर्ण केली.
प्रथम क्रमांकला 5001 दुसऱ्या क्रमांकाला 3001 व तिसरा क्रमांक आला 1501 रु बक्षीस व सर्टिफिकेट देण्यात आले. बक्षीस समारंभ माजी आमदार मोहन दादा जोशी यांच्या हस्ते पार पडला. त्यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या व स्व यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर भाषण केले. प्रमुख पाहुणे वीरेंद्र किराड व गणपतराव बालवडकर उपस्थित होते. बक्षीस समारंभ बालेवाडी H. K बालवडकर कॉलेज येथे झाला. अशी ही माहिती स्पर्धेचे संयोजक संजय बालगुडे यांनी दिली.