चित्रपट वारसा अभियान भारतीय चित्रपटांचा ठेवा जतन करण्याच्या प्रयत्नांना नवसंजीवनी देत आहे – अनुराग सिंह ठाकूर

Date:

पुणे-

केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच युवा व्यवहार व क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी 11 मार्च 2023 रोजी पुणे दौऱ्यादरम्यान राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला (एनएफडीसी) भेट दिली आणि राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान अंतर्गत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान भारतीय चित्रपटांचा ठेवा जतन करण्याच्या प्रयत्नांना नवसंजीवनी देत आहे, पूर्वी सहजपणे उपलब्ध नसलेले अनेक चित्रपट जगभरातील प्रेक्षकांसाठी सर्वोत्तम दर्जा राखून  उपलब्ध करून दिले जातील, तसेच पुढील 100 वर्षे आणि त्याहून अधिक काळासाठी भारतीय चित्रपटांचे दीर्घकालीन जतन खात्रीने केले जाईल, असे ठाकूर म्हणाले.

राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान जोमाने सुरु आहे. राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानाचा एक भाग म्हणून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात 3 मोठे प्रकल्प सुरु आहेत: चित्रपटांचे डिजिटायझेशन, चित्रपट  रील्सचे जतन आणि चित्रपट पूर्वस्थितीत आणणे. चित्रपटांचे जतन करण्याच्या दृष्टीने हे सर्व प्रकल्प प्रचंड मोठे आहेत आणि जागतिक स्तरावर अशा प्रकारचे प्रयत्न यापूर्वी कधीही करण्यात आलेले नाहीत. आतापर्यंत, 1293 चित्रपट, 1062 लघुपट आणि माहितीपट, 4K व 2K रिझोल्यूशनमध्ये डिजीटाईझ करण्यात आले आहेत. याशिवाय 2500 चित्रपट लघुपट आणि माहितीपट डिजिटायझेशनच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत.  दरम्यान, 1433 सेल्युलॉइड रिल्सच्या संवर्धनाची कामे पूर्ण झाली आहेत. जगातील चित्रपट संवर्धन क्षेत्रातील  आघाडीची तज्ज्ञ कंपनी ‘लीमॅजिन रिट्रोव्हाटा’ या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या  सहकार्याने अत्यंत काळजीपूर्वक हे काम करण्यात आले आहे. अनुराग सिंह ठाकूर यांनी एनएफडीसी -एनएफएआयच्या संकुलात नव्याने उभारलेल्या चित्रपट संवर्धन प्रयोगशाळेचीही पाहणी केली, या ठिकाणी  सेल्युलॉइड रील्स संवर्धनाचे काम सुरु आहे. पुढील काही महिन्यांत आणखी शेकडो चित्रपटांचे जतन केले जाईल, तर काही रील्स या दुर्मिळ भारतीय चित्रपटांच्या शिल्लक राहिलेल्या प्रती असू शकतात.  एनएफडीसी -एनएफएआयने अलीकडेच चित्रपट पूर्वस्थितीत आणण्याचे काम सुरु केले असून 21 चित्रपट डिजिटलरित्या  पुनर्संचयित केले जात आहेत. पुढील 3 वर्षांमध्ये, अनेक चित्रपट, लघुपट आणि माहितीपट डिजिटल पद्धतीने पूर्वस्थितीत आणले  जातील.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...