Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे 2023 H’ness CB350 आणि CB350RS लाँच

Date:

CB350 ग्राहकांसाठी नव्या प्रकारचा कस्टमायझेशन विभाग लाँच

माय सीबीमाय वे

Graphical user interface, application
Description automatically generated

आधुनिक

ताकदवान 350सीसीफोर स्ट्रोक ओएचसी सिंगल- सिलेंडर ओबीडी2बीचे पालन करणारे इंजिन पीजीएम-एफआय सह  

असिस्ट आणि स्लिपर क्लच

आधुनिक डिजिटल- अनालॉग मीटर

होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (एचएसटीसी)

होंडा स्मार्टफोन व्हॉइस कंट्रोल सिस्टीम (एचएसव्हीसीएस) [आता CB350RS मध्ये उपलब्ध]

इमरजन्सी स्टॉप सिग्नल (ईएसएस)

ग्राहकांसाठी नवे मूल्य देणारे उत्पादन

2023 H’ness CB350

 प्रकारांत उपलब्ध  – DLX, DLX Pro, DLX Pro Chrome

किंमत रू. २०९,८५७ पासून सुरू (एक्स शोरूम दिल्ली)

2023 CB350RS

 प्रकारांत उपलब्ध  – DLX, DLX Pro, DLX Pro Dual Tone.

किंमत रू. २१४,८५६ पासून सुरू (एक्स शोरूम दिल्ली)

होंडा बिगविंगचे सर्व वितरक आणि अधिकृत संकेतस्थळावर बुकिंग्ज खुले (www.hondabigwing.in)

नवी दिल्ली१० मार्च २०२३ – मध्यम आकाराच्या मोटरसायकल क्षेत्रात क्रांती घडवून आणत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने आज OBD2B चे पालन करणाऱ्या 2023 H’ness CB350 & CB350RS लाँच केल्या आहेत. या नव्या मोटरसायकल्स मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत देशभरातील सर्व बिगविंग वितरकांकडे उपलब्ध असतील. 2023 H’ness CB350 ची किंमत रू. २०९,८५७ पासून सुरू, तर CB350RS ची किंमत रू२१४,८५६ पासून सुरू (एक्स शोरूम दिल्ली) आहे. एचएमएसआयने CB350 ग्राहकांसाठी कस्टमायझेशनचा नवा विभाग – माय सीबी, माय वे सुरू केला आहे. होंडा जेन्युईन अक्सेसरीज म्हणून विकले जाणार असलेले हे कस्टम किट्स मार्च २०२३ च्या अखेरपर्यंत बिगविंग वितरकांकडे उपलब्ध असतील.

नवी 2023 CB350s लाँच करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘सरकारने घालून दिलेल्या वेळमर्यादेआधीच एचएमएसआयने आपली उत्पादन श्रेणी नव्या नियमांनुसार तयार करण्यास सुरुवात केली होती. आज आम्ही OBD2B चे पालन करणाऱ्या भविष्यवेधी 2023 H’ness CB350 and CB350RS लाँच केल्या आहेत. स्थापनेपासूनच CB350s ला केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ‘माय सीबी, माय वे’ या नव्या कस्टमायझेशन विभागाअंतर्गत खास तयार करण्यात आलेले कस्टम किट्स CB350 च्या नव्या तसेच    सद्य ग्राहकांना आनंद देतील अशी आम्हाला खात्री वाटते.’

या घडामोडीविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या प्रीमियम मोटरसायकल बिझनेस विभागाचे ऑपरेटिंग अधिकारी श्री. पी. राजागोपी म्हणाले, ‘नवा कस्टमायझेशन विभाग सुरू केल्यामुळे ग्राहकांना आता मोटरसायकलच्या माध्यमातून आपली अनोखी स्टाइल आणि व्यक्तिमत्त्व मांडता येणार आहे. माय सीबी, माय वे हा विभाग ग्राहकांच्या सातत्याने बदलत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आला असून त्याची सुरुवात CB350 साठी बनवलेल्या कस्टम किट्सपासून करण्यात आली आहे. हे किट्स मार्च २०२३ च्या अखेरपर्यंत बिगविंग वितरकांकडे उपलब्ध होतील. आज आम्ही OBD2B चे पालन करणाऱ्या 2023 CB350 H’ness and CB350RS मोटरसायकल्स सरकारी वेळमर्यादेआधीच लाँच केल्या आहेत.’

H’ness CB350 मध्ये होंडाचे अभिजात डिझाइन आणि ठळक व्यक्तिमत्त्व यांची सांगड घालण्यात आली आहे. तिची स्टाइल नव्या युगातील मोटरसायकल चालकांना स्वतःचे अनोखे व्यक्तिमत्त्व मांडणारी वाटेलतर दुसरीकडे CB350RS आधुनिक स्टाइल आणि दर्जेदार स्टान्सचे उत्तम उदाहरण आहे.

आधुनिक

CB350 मध्ये मोठे, ताकदवान, ३५० सीसी, एयर कुल्ड ४ स्ट्रोक ओएचसी सिंगल- सिलेंडर OBD2B चे पालन करणारे इंजिन पीजीएम- एफआय तंत्रज्ञानासह बसवण्यात आले आहे. याचा मॅक्स टॉर्क 30 Nm@3000 आरपीएम आहे.

सिलिंडरवर ठेवलेला मेन शाफ्ट कोएक्सियल बॅलेंसर प्राथमिक आणि दुय्यम दोन्ही कंपने काढून टाकतो, ज्यामुळे ते दीर्घ राइड्ससाठी एक उत्तम साथीदार बनते, एक अत्यंत आकर्षक इंजिन अनुभव देते जे लाँग स्ट्रोक इंजिनमधून थ्रोब्स प्रसारित करते.

सिलेंडरवर बसवण्यात आलेला मेन शाफ्ट कोएक्सिल बॅलन्सर प्राथमिक आणि दुय्यम प्रकारची कंपने काढून टाकतो, ज्यामुळे ती दूरवरच्या प्रवासासाठी एक उत्तम साथीदार बनते आणि आकर्षक इंजिनचा फील लाँग स्ट्रोक इंजिनमधून थ्रोब्ज प्रसारित करते.

CB350 एक्झॉस्ट यंत्रणेमध्ये मोठी, ४५ मिमीची टेलपाइप देण्यात आली आहे, जी ठळक परंतु सौम्य स्वरुपाच्या आवाजाच्या निर्मितीचा समतोल साधते. एक्सपान्शन चेंबरमधील एका चेंबरचा एक आराखडा थ्रॉटल थंपिंग एक्झॉस्ट नोट डिलीव्हर करण्यास मदत करते.

इंजिनमध्ये ऑफसेट सिलेंडर पोझिशन वापरण्यात आली आहे, जी स्लायडिंग फ्रिक्शन कमी करते आणि असिमेट्रिकल कनेक्टिंग रॉड कंबशनवेळेस उर्जा कमीत कमी प्रमाणात खर्च होईल याची खात्री करते. यामध्ये क्लोज्ड क्रँककेस क्रँककेस आणि ट्रान्समिशनदरम्यान भिंतीसारखी देण्यात आली आहे, ज्यामुळे अंतर्गत फ्रिक्शनमधून होणारा उर्जेचा विनाश कमी होतो.

एयर कूलिंग यंत्रणा कार्यक्षमता उंचावण्यासाठी घनदाट हवेचा पुरवठा कायम राखते आणि इंजिनचे तापमान आदर्श श्रेणीत ठेवत सर्व आरपीएम श्रेणीत अनुकूल कंबशन राहील याची खात्री करते. पिस्टन कुलिंग जेट इंजिनची थर्मल कार्यक्षमता सुधारते आणि पर्यायाने इंधन कार्यक्षमताही उंचावते.

होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (एचएसटीसी) पुढच्या आणि मागच्या चाकाच्या वेगातील फरक जाणून घेत रियर व्हील ट्रॅक्शन कायम राखण्यात मदत केली जाते तसेच स्लिप रेशियो मोजला जातो आणि फ्युएल इंजेक्शनद्वारे इंजिन टॉर्कचे नियंत्रण केले जाते. मीटरच्या डाव्या बाजूला असलेला स्विच वापरून एचएसटीसी चालू/बंद करता येऊ शकते. सिस्टीम कार्यरत असताना डिजिटल डिस्प्लेवरील ‘T’ फ्लिकर होतो.

होंडा स्मार्टफोन व्हॉइस कंट्रोल सिस्टीममुळे (एचएसव्हीसीएस) रायडर्सना रायडिंगचा आनंद घेत असतानाच जगाबरोबरही कनेक्ट राहाता येते. राइडसह असलेला कनेक्ट आणखी बळकट करण्यासाठी H’ness CB350 & NEWCB350RS मध्ये (DLX Pro व्हेरिएंट) जगातील पहिली, कंपनीअंतर्गत विकसित करण्यात आलेली होंडा स्मार्टफोन व्हॉइस कंट्रोल सिस्टीम (एचएसव्हीसीएस) बसवण्यात आली आहे. रायडर्सना आता ब्लुटुथद्वारे एचएसव्हीसीएस अप्लिकेशनमधून आपला स्मार्टफोन मोटरसायकलशी कनेक्ट करता येईल. कनेक्ट झाल्यानंतर रायडरच्या हँडलबारच्या डाव्या बाजूस असलेल्या कंट्रोल्सच्या मदतीने सिस्टीम म्हणजेच फोन कॉल्स, नॅव्हिगेशन, म्युझिक प्लेबॅक आणि इनकमिंग मेसेजेस अशा सुविधा वापरता येतील. रायडिंगवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी अक्सेस करण्यात येत असलेली माहिती हेल्मेट हेडसेट स्पीकर्सद्वारे दिली जाईल.*

असिस्ट आणि स्लिपर क्लचमुळे क्लच लिव्हर ऑपरेशन लोड कमी करताना गियर शिफ्ट सफाईदार होते आणि कमी थकवा येतो तसेच सततचे शिफ्टिंग कराव्या लागणाऱ्या राइड्समध्ये जास्त आराम मिळतो.

आधुनिक डिजिटल- अनॉल़ग मीटरमध्ये टॉर्क कंट्रोल, एबीएस, इंजिन इनहिबिटरसह साइड स्टँड इंडिकेटर, गियर पोझिशन इंडिकेटर आणि बॅटरी व्होल्टेज अशाप्रकारचे तपशील देण्यात आले आहेत. त्याचबरोबर इंधन कार्यक्षमतेचे तपशील तीन मोड्समध्ये – रियल टाइम मायलेजअव्हरेज मायलेज आणि डिस्टन्स टु एम्प्टी देऊन रायडिंगचा अनुभव आणखी समृद्ध करण्यात आला आहे.

२०२३ CB350s मध्ये नवा इमरजन्सी स्टॉप सिग्नल (ईएसएस) देण्यात आला आहेजो अचानक ब्रेक लावावे लागल्यास मागे असलेल्या वाहनांना संदेश देतो. एबीएस मोड्युलेटरला अचानक ब्रेकिंग होत असल्याचे कळते तेव्हा वळण्याचा सिग्नल वेगाने फ्लॅश होतो आणि मागे असलेल्या वाहनांना पटकन संदेश मिळतो. फुल एलईडी सेटअपमुळे रायडर्सना अंधारातून वाट काढणेघनदाट अंधारी रस्ताही प्रकाशमान करणे शक्य होतेचशिवाय त्यांचा लूकही स्टायलिश आहे.

आराम आणि सोयीस्करपणा

ड्युएल चॅनेल एबीएसमुळे अचानक ब्रेक लावल्यास चाके लॉक होत नाहीत किंवा निसरड्या रस्त्यावरही आत्मविश्वासाने गाडी चालवता येते. मोटरसायकलचा तोल सांभाळण्यासाठी पुढच्या बाजूस ३१० मिमी डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस २४० मिमी रियर डिस्क देण्यात आले आहेतजे कोणत्याही परिस्थितीत ब्रेकिंग चांगल्या दर्जाचे होईल याची खात्री करतात.

स्टील पाइपमधील हाफ- ड्युप्लेक्स क्रेडल फ्रेम सॉफ्ट स्टियरिंगचा फील देण्यासाठी वापरण्यात येते. पुढच्या बाजूस विभागून देण्यात आलेला लोड गुरुत्वाकर्षणाचे केंद्रस्थान खाली आणण्यासाठी इंजिन वरच्या बाजूस बसवून त्याचा तोल साधण्यात आला आहे. यामुळे एकंदर रायडिंगचा अनुभव आणि मोटरसायकलची वाट काढण्याची क्षमता यामध्ये फरक पडला आहे.

लार्ज सेक्शन फ्रंट सस्पेन्शनमुळे मोटरसायकलची भव्यता तसेच प्रतिमा आकर्षक झाली आहे, शिवाय ती खडबडीत रस्त्यावर आरामदायीपणा देते. प्रेशराइज्ड नायट्रोजेन चार्ज्ड रियर सस्पेन्शन उच्च दर्जाची प्रतिसाद क्षमता असलेलीरियर डॅम्पिंग कामगिरी करते.

इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विचमुळे छोट्या थांब्यांवर इंजिन पटकन बंद करण्याची सोय होते. कमी दृश्यमानता असलेल्या ठिकाणी रायडरची सुरक्षितता जपण्यासाठी हझार्ड स्विच वैशिष्ट्याची मदत होते.

सीटचे टक अँड रोल डिझाइन (CB350RS) दर्जेदार कुशनिंगसह बनवण्यात आल्यामुळए रोजचा प्रवास तसेच लांबच्या प्रवासातील राइड आरामदायी होते.

2023 H’ness CB350 मध्ये आता स्पिल्ट सीट बसवण्यात आली आहे. यामध्ये दिले जाणारे उच्च दर्जाचे कुशनिंग अतिशय आरामदायी राइडचा अनुभव देते. त्याशिवाय याची मागच्या बाजूस झुकलेली खास रियर ग्रिप पिलियनचा प्रवासही आरामदायी होईल याची काळजी घेते.

इको इंडिकेटरमुळे प्रवास स्मार्ट होण्यास मदत होतेकारण हा इंडिकेटर रायडिंगचा वेग आणि इंजेक्टेड इंधनाचे प्रमाण मोजून वाजवी रायडिंग कसे होईल हे दर्शवते १५ लीटरची इंधनाची टाकी आणि टॉप क्लास मायलेजमुळे दीर्घ पल्ल्याचा प्रवास अखंडितपणे करता येतो.

व्हेरिएंट्सरंग आणि किंमत

K0ZA SIDE COVER Hness EMBLEM
व्हेरिएंट्सकिंमतरंग
डीएलएक्सरू. २०९, ८५७प्रेशियस रेड मेटॅलिक, पर्ल नाइट स्टार ब्लॅक, मॅट मॅसिव्ह ग्रे मेटॅलिक, मॅट मार्शल ग्रीन मेटॅलिक
डीएलएक्स प्रोरू. २१२,८५६प्रेशियस रेड मेटॅलिक, पर्ल नाइट स्टार ब्लॅक, मॅट मार्शल ग्रीन मेटॅलिक
डीएलएक्स प्रो क्रोमरू. २१४,८५६अथलेटिक ब्लू मेटॅलिक, मॅट मॅसिव्ह ग्रे मेटॅलिक, पर्ल नाइट स्टार ब्लॅक
K0ZA RS Emblem Data_05_Jan_2021
व्हेरिएंट्सकिंमतरंग
डीएलएक्सरू. २१४,८५६अथलेटिक ब्लू मेटॅलिक, मॅट मॅसिव्ह ग्रे मेटॅलिक
डीएलएक्स प्रोरू. २१७,८५७ब्लॅक विथ पर्ल स्पोर्ट्सरेडिएंट रेड मेटॅलिक
डीएलएक्स प्रो ड्युएल टोनरू. २१७,८५७यलो 

एचएमएसआयद्वारे ६ वर्षांचे वॉरंटी पॅकेज (३ वर्ष स्टँडर्ड + ३ वर्षांची पर्यायी विस्तारित वॉरंटी) H’ness-CB350 आणि CB350RS मोटरसायकल्सवर.

उत्पादन पॅकेजमध्ये हेल्मेट हेडसेटचा समावेश नाही.

Graphical user interface, application
Description automatically generated

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने भारतात पहिल्यांदाच CB350 ग्राहकांसाठी नवा कस्टमायझेशन विभाग – माय सीबी, माय वे लाँच केला आहे. होंडा जेन्युईन अक्सेसरीज नावाने याची विक्री केली जाणार असून एचएमएसआयद्वारे त्यावर १ वर्षाची स्टँडर्ड वॉरंटी दिली जाणार आहे.

हे कस्टम किट्स मार्च २०२३ च्या अखेरपर्यंत बिगविंग वितरकांकडे उपलब्ध होतील.

1.       Graphical user interface, website
Description automatically generated

कम्फर्ट कस्टम– निवांत रायडर्ससाठी

(H’ness CB350)

बंडलमध्ये पुढील गोष्टींचा समावेश:

·         मुख्य सीट

·         वाइड स्टेप

·         इंजिन अप्पर पाइप

·         इंजिन लोअर पाइप

·         फ्रंट फोर्क बूट

·         बॅक रेस्ट

·         नकल गार्ड

·         लाँग व्हायसर

·         सपोर्ट पाइप बी

कमाल रिटेल किंमत रू. १६,५००

2.       Graphical user interface, website
Description automatically generated

टुअरर कस्टम – भटक्यांसाठी

(H’ness CB350)

बंडलमध्ये पुढील गोष्टींचा समावेश:

·         मुख्य सीट

·         साइड कव्हर गार्निश

·         इंजिन अप्पर पाइप

·         इंजिन लोअर पाइप

·         फ्रंट फोर्क बूट

·         सपोर्ट पाइप बी

·         रियर कॅरीयर

·         नकल गार्ड

·         लाँग व्हायसर

कमाल रिटेल किंमत – रू. १७,६००

      Graphical user interface, application, website
Description automatically generated

कॅफे रेसर कस्टम – आरामाच्या शोधात असलेल्यांसाठी

(H’ness CB350)

बंडलमध्ये पुढील गोष्टींचा समावेश:

·         व्हील स्टाइप

·         मुख्य सीट

·         साइड कव्हर गार्निश

·         फ्रंट कव्हर बूट

·         ग्रिप एंड

·         हेडलॅम्प काउल

·         सिंगल सीट काउल

·         स्किड प्लेट

कमाल रिटेल किंमत – २२,२००

     Graphical user interface, website
Description automatically generated

सोलो कॅरीयर कस्टम – जग जिंकू इच्छिणाऱ्यांसाठी

(H’ness CB350)

बंडलमध्ये पुढील गोष्टींचा समावेश:

·         व्हील स्टाइप

·         मुख्य सीट

·         साइड कव्हर गार्निश

·         इंजिन अप्पर पाइप

·         इंजिन लोअर पाइप

·         फ्रंट कव्हर बूट

·         ग्रिप एंड

·         मीटर व्हायसर

·         सोलो कॅरीयर

कमाल रिटेल किंमत रू. – १६२००

5.       Graphical user interface, website
Description automatically generated

कॅफे रेसर कस्टम – आरामाच्या शोधात असलेल्यांसाठी

(CB350RS)

बंडलमध्ये पुढील गोष्टींचा समावेश:

·         व्हील स्ट्राइप

·         इंजिन अप्पर पाइप

·         ग्रिप एंड

·         हेडलॅम्प काउल

·         सिंगल सीट काउल

कमाल रिटेल किंमत रू. १७,५००

6.       एसयूव्ही कस्टम – भटक्यांसाठी

Graphical user interface, application
Description automatically generated

(CB350RS)

बंडलमध्ये पुढील गोष्टींचा समावेश:

·         व्हील स्ट्राइप

·         व्हील स्ट्राइप

·         नकल गार्ड

·         इंजिन अप्पर पाइप

·         इंजिन लोअर पाइप

·         मीटर व्हायजर

·         सपोर्ट पाइप ए

कमाल रिटेल किंमत रू. ७१००

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आज इंडिगोची ६५० हून अधिक उड्डाणे रद्द:६१० कोटी केले रिफंड,३०००प्रवाश्यांच्या बॅगा दिल्या परत …

मुंबई-आज इंडिगोच्या ६५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली...

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशन तयारीचा सविस्तर आढावा

“वीजपुरवठा, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनात कोणतीही त्रुटी राहणार नाही...