Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

“भाजपाला तेव्हा… गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं, ”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले निवडणूक आयोगाच्या बापाने नव्हे तर माझ्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली .

Date:

खेड- “शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाच्या वडिलांनी नाही, तर माझ्या वडिलांनी केली आहे,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. तसेच भाजपाला आधी गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं, असं म्हणत खोचक टोला लगावला.उद्धव ठाकरे म्हणाले, “मला निवडणूक आयोगाला खास सांगायचं आहे की, त्यांच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल, तर कोणती शिवसेना खरी आहे हे पाहायला इकडं या. हा ‘चुना लगाव आयोग’ आहे. ते सत्येचे गुलाम आहेत. वरून जे आदेश येतात त्याप्रमाणे वागणारे हे त्यांचे गुलाम आहेत. हे निवडणूक आयुक्त म्हणून राहायच्या लायकीचे नाहीत, हे मी उघडपणे बोलतो आहे.

​​​​​​उद्धव ठाकरे यांची आज खेड येथील गोळीबार मैदानात सभा झाली . या सभेत सुषमा अंधारे यांनी आपले घणाघाती भाषण करून शिंदे गट, भाजप, किरीट सोमय्यांना लक्ष केले.उद्धव ठाकरे म्हणाले,’म्हणाले, जे ढेकणं आपले रक्त पिऊन फुगली त्यांना चिरडण्याची ताकद एका बोटात आहेत. तोफेची गरजही नाही. आमच्याकडे मुलुखमैदानी तोफ आहे. संजय कदमांच्या रुपाने आपली तोफ परत आपल्याकडे आली. तोफा देशद्रोह्यांविरोधात वापरायच्या असतात.

उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांना आजपर्यंत जे – जे मिळाले ते खोक्यात बंद झाले. माझ्या हातात आज काही नाही. रिकामे आहे, मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. आज मी तुमच्याकडे आशिर्वाद मागायला आलो आहे. तुमची साथ हवी. जे भुरटे चोर, गद्दार आहेत त्यांना सांगतो की, नाव, शिवसेना पक्षाचे चिन्ह चोरला पण शिवसेना चोरू शकत नाही. मला निवडणूक आयोगाला सांगायचे की, तुमच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल तर शिवसेना पाहायला खेडमधील सभा पाहायला या. चुना लावणारा तो आयोग आहे.ठाकरे म्हणाले, मुख्यमंमत्र्यांचा अर्धा वेळ दिल्लीतच जात आहे. जागतिक पातळीवर कोरोना काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचेच नाही तर सर्व लोकांचे कौतूक झाले. त्याही परिस्थितीत आपल्याकडे उद्योगधंदे येत होते. सर्व उद्योग गुजरातेत गेले. आयफोनचा कारखाना कर्नाटकात जातो महाराष्ट्राच्या हाती काय आहे.

ठाकरे म्हणाले, एसटी महामंडळाच्या बसवर आमची जाहीरात होती की, माझा महाराष्ट्र माझे कुटुंब होय महाराष्ट्र माझे कुटुंब आहे. पण जो कुटुंब बदलतो तो महाराष्ट्राची जबाबदारी काय घेणार? कानडी मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले पण आपले शेपूट घालून बसले. आमचे मविआ सरकार चांगले चालत होते पण माशी कुठे शिंकली. नितीन देशमूखांनी भर सभेत सांगितले की, कसे झोपेचे इंजेक्शन दिले. कसा छळ झाला. त्यांनी छळून लोकांना गटात ओढले. राजन साळवींच्या घरी छापा घातला.उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही देशद्रोही नाही तुम्ही कसे म्हणता तुम्ही बोलू शकत नाही. आ्म्ही जीभ छाटू. मुंबई वाचवणारे सैनिक आज तुम्हाला देशद्रोही वाटतात. केजरीवाल माझ्याकडे आले व म्हणाले की, आपल्याला एकत्र लढायला हवे. आम्ही पंतप्रधानांना पत्राद्वारे प्रश्न विचारला. ज्यांच्या – ज्यांच्यावर आरोप झाले त्यांच्यावरील कारवाईबाबत विचारणा केली.उद्धव ठाकरे म्हणाले, पोपटांना पिंजऱ्यात टाकण्याची वेळ आली आहे. त्यांची पाप कमी आहेत का, विरोधी पक्षात असले की, गुन्हेगार, भ्रष्ट्राचारी. आज भाजपमध्ये जास्त भ्रष्ट्राचारी आहेत. आधी भाजपच्या व्यासपीठावर साधूसंत दिसायचे आता संधी साधू दिसतात.उद्धव ठाकरे म्हणाले, कितीही खान येऊद्या हल्ली मी त्यांना मोगॅंबो म्हणत आहे. ते आपल्याला आपसांत लढवत आहेत. जागतिक स्तरावर जो घोटाळा होत आहे त्याची चौकशी होत नाही पण सामान्यांच्या मागे लागतात. कुटुंब परिवारवादावर ते बोलतात. मी म्हणतो मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा, बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे होय आमच्या सहा पिढ्या महाराष्ट्राची सेवा करीत आहात. आमच्यावर परिवारवादाचा ठपका ठेवता तुमची वंशावळ काय?उद्धव ठाकरे म्हणाले, पुण्यात अमित शहा येऊन बोलले की, उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी काॅंग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटतात. तुम्ही काय चाटतात. शिवसेनेचा , मराठी माणसांचा आवाज ते संपवत आहेत. एकदिवस त्यांना देश संपवायचा आहे.उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्हाला शिवसेनेचा पक्षप्रमुख मिंधे चालेल का? तुम्ही सांगा मी हवा की नको तुम्ही सांगा. निवडणूक आयोगाने चोंबडेपणा करायचा नाही. मी सहन करून घेणार नाही. शिवसेना आमची आहे. तुमची परवानगी घेवून शिवसेनेची स्थापना झाली नाही. न्याय हक्कासाठी लढण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे. तुमच्या सारखे आले आणि गेले जातीलही पण शिवसेना कायम राहील.उद्धव ठाकरे म्हणाले, आजपासून ते आशिर्वाद यात्रा काढीत आहेत. चोरांना तुम्ही आशिर्वाद देणार. मिंध्येंच्या हातात धनुष्यबाण दिला पण चेहरा चोरासारखा झाला. तुमच्या हातात धनुष्यबाण घेण्याचा प्रयत्न करा पण मेरा खानदान पुरा चोर है हे कपाळावर लागेल ते अजिबात या जन्मात पुसले जाणार नाही. आम्ही काय असे पाप केले, कोविडमध्ये चांगले काम केले ते पाप, कोकणाच्या विकासासाठी प्रयत्न केले ते पाप. कोकण शिवसेनेचे जीव की, प्राण आहे. शिवसेनेची सत्ता गेली पण कोकणात विजयी झालो. शिवसेनाप्रमुखांनी याच मैदानात माथा टेकवला.उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांचा स्वातंत्र्यलढ्याची काडीमात्र संबंध नाही ते गादीवर बसले म्हणून अशी देशाची परिस्थिती आहे. गोमूत्र शिंपडून देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही तर शहीदांच्या रक्ताने स्वातंत्र्य मिळाले.

संजय कदम यांचा ठाकरे गटात प्रवेश

या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांचा ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेशही झाला आहे. त्यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनीही ठाकरे गटात आज प्रवेश केला. यावेळी ठाकरेंनी शिवबंधन हाती बांधले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...