पंजाब मध्ये अमृतसर इथं 19 ते 20 मार्च 2023 दरम्यान पहिली कामगार 20 (L20) बैठक आयोजित करण्यात आली आहे. जी-20 अंतर्गत संलग्न गटापैकी L20 हा एक गट आहे. यात जी 20 देशांच्या ट्रेड युनियन केंद्रांचे नेते आणि प्रतिनिधींचा समावेश असून ते कामगारांशी संबंधित समस्या सोडवण्याच्या उद्देशानं विश्लेषण आणि धोरण शिफारसी करतात. भारताच्या जी 20 अध्यक्षतेखाली भारतीय मजदूर संघ (BMS) हा L20 स्थापना बैठकीचं आयोजन करणारा एक प्रमुख राष्ट्रीय ट्रेड युनियन केंद्र आहे. या बैठकी शिवाय L20 बैठकीत सहभागी होणाऱ्यांना अमृतसरच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडवण्याच्या उद्देशानं विविध ठिकाणांची सफर घडवण्यात येणार आहे.
पंजाब मध्ये अमृतसर इथं 19 ते 20 मार्च 2023 दरम्यान पहिल्या कामगार 20 (L20) बैठकीचं आयोजन
Date:

