चंद्रकांतदादा पाटील यांचा विशेष पुढाकारातून पुण्यातील दिव्यांग बांधवांना मिळणार कृत्रिम अवयव

Date:

समाजातील दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात नवी उमेद निर्माण करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून आणि तर्क फाऊंडेशन, भारत विकास परिषद, फ्युप्रो, मिशेलिन आणि समुत्कर्ष सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २० फेब्रुवारी रोजी मोफत कृत्रिम अवयव वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये राबवण्यात आलेल्या तपासणी शिबिरातून निवड झालेल्या पुण्यातील लाभार्थ्यांना या सोहळ्यात प्रत्यक्ष अवयवांचे वाटप केले जाणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश दिव्यांग व्यक्तींची गतिशीलता वाढवणे आणि त्यांना आत्मसन्मानाने जगण्यास मदत करणे हा आहे.केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार मेधाताई कुलकर्णी आणि पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ०४.३० वाजता कोथरुड मधील थरकुडे दवाखाना येथे हा अवयव प्रदान सोहळा संपन्न होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवजयंती निमित्त शिवरायांना सरदारांच्या वंशजांकडून मानवंदना

पुणे : तिरुपती बालाजीची फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ...

ऊर्जा संपन्नेबाबत पुण्यात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद दिमाखदात संपन्न

देशातील 'सीजीडी' क्षेत्राच्या विस्तारासाठी जागतिक नवकल्पनांवर भर पुणे: पेट्रोलियम आणि...

छत्रपती शिवरायांच्या मार्गावर चालणे हाच विकासाचा खरा मार्ग-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे – छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा...