ऊर्जा संपन्नेबाबत पुण्यात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद दिमाखदात संपन्न

Date:

देशातील ‘सीजीडी’ क्षेत्राच्या विस्तारासाठी जागतिक नवकल्पनांवर भर

पुणे: पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ (PNGRB) आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट येथे आयोजित या परिषदेचा मुख्य विषय “भारतातील सीजीडी (सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन) वाढीला चालना देण्यासाठी जागतिक नवकल्पनांचा लाभ” यावर विशेष भर देण्यात आला.परिषदेतील विविध पॅनेल चर्चा सत्र मध्ये PNGRB, MNGL, गेल, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL), MGL, टोरॅंट गॅस, भारत पेट्रोलियम (BPCL), अल्ट्रा गॅस अँड एनर्जी आणि आयनॉक्स इंडिया यांसारख्या प्रमुख संस्थांचे प्रमुख प्रतिनिधी सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने सीजीडी वाढीला गती देणे, supply chain, सुरक्षा बळकट करणे, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि भारताला नैसर्गिक वायू-आधारित अर्थव्यवस्था’ बनवण्याच्या दृष्टीने करावयाचे प्रयत्न यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. दोन दिवसीय परिषदेत मॅकिन्से अँड कंपनी, ग्रीन पॉवर इंटरनॅशनल, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI), थिंक गॅस, कॉम्पॅक, गेल (GAIL) आणि प्राज इंडस्ट्रीजमधील मान्यवरांनी विशेष सादरीकरणे केली. यावेळी त्यांनी गॅस क्षेत्रातील जागतिक स्तरावर होणारे बदल आणि भारतातील संधी यावर महत्त्वपूर्ण प्रकाश टाकला.या परिषदेत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ विजय केळकर यांची विशेष उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभले.पीएनआरजीबीच्या अंजनी कुमार तिवारी यांनीही उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच, परिषदेत ग्रीन पॅावर, डीएमएच, एआरएआय, थिंक गॅस, युरोटेक, कॅाम्पॅक, गेल, प्राज इंडस्ट्रीज, एबीबी आदी कंपन्यांच्या प्रमुख प्रतिनिधीनी सहभागी होऊन आपले विचार मांडले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

चंद्रकांतदादा पाटील यांचा विशेष पुढाकारातून पुण्यातील दिव्यांग बांधवांना मिळणार कृत्रिम अवयव

समाजातील दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात नवी...

छत्रपती शिवरायांच्या मार्गावर चालणे हाच विकासाचा खरा मार्ग-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे – छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा...

मिळकत कर,पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थावरुन प्रशासनाला धरले धारेवर…

LIVE - पुणे महापालिका मुख्य सभा 18 फेब्रुवारी 2026 पुणे...