छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य पदयात्रा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

Date:

पुणे : भारत सरकारचे युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय, भारत सरकारच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग आणि पुणे महानगरपालिका यांच्या समन्वयाने शिवजयंती दिनानिमित्त ‘मेरा युवा भारत” भव्य पदयात्रेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून पदयात्रेचा शनिवार वाडा येथून शुभारंभ करण्यात आला.यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, शिक्षण उपायुक्त वसुंधरा बारवे, मनपा उपायुक्त संदीप खलाटे, जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार स्मिता माने,अर्जुन पुरस्कार प्राप्त काकासाहेब पवार, भारतीय खो खो संघाचे कर्णधार प्रतीक वायकर तसेच शिक्षण, पर्यटन, क्रीडा, आरोग्य व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.महापौर श्रीमती नागपुरे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण अंगीकारले पाहिजेत. शिवजयंती ही औपचारिक मिरवणूक न राहता ती तरुण पिढीला महाराजांच्या विचारांशी जोडणारी, सगळ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण करणारी ठरावी. आपले सण- परंपरा सर्वांनी एकत्र येऊन साजरे केले पाहिजेत. सर्व महानुभाव, युगपुरुषांच्या जयंती एकत्र येऊन साजरे करुया सर्वांमध्ये सांघिक भावना निर्माण होऊन शिवरायांचे विचार आचरणात यावेत, असा संकल्प यानिमित्ताने करुया, असे त्या म्हणाल्या.युवा पिढीने थोरा मोठ्यांचा वारसा जतन करावा, तरुण पिढीमध्ये ऊर्जा नवसंकल्पना जागृत करण्याच्या उद्देशाने या पदयात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे श्री. लकडे यांनी प्रास्ताविकात सांगितले.या पदयात्रेचा शनिवार वाडा येथून शुभारंभ होऊन एस एस पी एम शाळेजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. पदयात्रेत पारंपरिक वेशभूषेत राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, व्यवसाय शिक्षण, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सुमारे २ हजार विद्यार्थी- विद्यार्थीनी सहभाग घेतला.यावेळी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“ए आय चा विवेकी वापर  व्हावा” :संवाद कार्यक्रमातील सूर 

 सत्यशोधक विचार आणि एआय' विषयावर संवाद कार्यक्रम   महात्मा फुले यांच्या...

एमआयटी एडीटीचा बेंटली सिस्टिम्ससोबत करार

डिजिटल पायाभूत सुविधा शिक्षणासाठी ‘इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन’ उत्कृष्टता केंद्र सुरू पुणे...