अभय योजनेस एक महिन्यांची मुदतवाढ द्या,सभागृह नेते गणेश बिडकरांची आयुक्तांकडे मागणी

Date:

पुणे : महापालिकेकडून मिळकतकराची थकीत रक्कम 75 टक्के सवलतीत भरण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या ‌अभय योजनेची मुदत 15 फेबुवारी रोजी संपणार आहे. पुणेकर मिळकत धारकांकडून या योजनेस उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून थकबाकीदारांकडून मोठ्या प्रमाणात थकीत कर देखील भरण्यात आलेला आहे. त्यामुळे योजनेस आणखीन एक महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

कर संकलन विभागाकडून ही योजना १५ नोव्हेंबर पासून लागू करण्यात आली. मोठ्या प्रमाणात करवसुली झाली असली, तरी अनेक थकबाकीदारांनी अद्यापही कर भरणा करणे बाकी आहे. योजनेस एक महिन्यांची मुदतवाढ दिल्यास महापालिकेच्या महसुलात वाढ होतानाच पुणेकरांना देखील फायदा होणार आहे. त्यामुळे १५ मार्च २०२६ पर्यंत अभय योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी गणेश बिडकर यांनी केली आहे.

“अभय योजनेला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असून महापालिकेच्या महसुलात वाढ झाली आहे. १३ फेब्रुवारीपर्यंत जवळपास १ लाख ३५ हजारांच्यावर मिळकतकर धारकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, ८०१ कोटी रुपयांपेक्षा जास्त कराची वसुली झाली आहे. पालिकेचा महसूल वाढवणे आणि नागरिकांना सवलतीचा लाभ देण्यासाठी योजना अत्यंत महत्त्वाची आहे. पुणेकरांना आणखी एक संधी देण्यासाठी अभय योजनेस १५ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देणे आवश्यक आहे” असं गणेश बिडकर यावेळी म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम व्हावे – योगेश सोमण

मसाप निवडणूक'साहित्य संवर्धन आघाडी’ जाहीरनामा प्रसिद्ध पिंपरी, पुणे (दि. १३...

अभय योजनेस 15 मार्चपर्यंत मुदतवाढ, गणेश बिडकरांच्या मागणीला तत्काळ यश

पुणे (दि. १३) : महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी राबविण्यात येत...

महापालिकेच्या विविध समित्यांवर सदस्यांची झाली निवड

पुणे - महापालिकेच्या मुख्य सभेत आज स्थायी समिती सदस्यांच्या...