मुंबई: दि. ३० डिसेंबर २०२५ – महावितरणच्या २०२६ या वर्षाच्या दैनंदिनीचे मंगळवारी मुंबईतील फोर्ट येथील एचएसबीसी कार्यालयात उत्साहात प्रकाशन करण्यात आले. अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या शुभहस्ते ही दैनंदिनी प्रकाशित करण्यात आली.
याप्रसंगी संचालक (संचालन/प्रकल्प) श्री. सचिन तालेवार, संचालक (वित्त) श्री. अनुदीप दिघे, संचालक (वाणिज्य) श्री. योगेश गडकरी, संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार, स्वतंत्र संचालक श्री. विश्वास पाठक आणि संचालिका श्रीमती ज्योती चिमटे यांची प्रमुख उपस्थिती होती. केवळ तारखा आणि वार पाहण्यासाठीच नव्हे, तर प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठीही दैनंदिनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. या दैनंदिनीमध्ये महावितरणच्या राज्यभरातील क्षेत्रीय कार्यालये व अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक, महावितरणची वाटचाल व कामगिरी यांच्या माहितीचा समावेश आहे. या दैनंदिनीमुळे कामकाजात समन्वय राखणे सोपे होणार आहे.
प्रकाशनानंतर, श्री. लोकेश चंद्र यांनी उपस्थित सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि ही दैनंदिनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. दैनंदिनी वेळेत व सुबकपणे प्रकाशित केल्याबद्दल श्रीमती आभा शुक्ला, श्री लोकेश चंद्र यांनी जनसंपर्क विभागाचे अभिनंदन केले.

