जागावाटपात विश्वासघात केल्याचा आरोप करत रामदास आठवलेंचा भाजपला दणका, मुंबईत 39 रिपाई उमेदवार रिंगणात उतरवले

Date:

मुंबई-महापालिका निवडणुकीच्या जागावाटपात शेवटपर्यंत रिपाईला झुलवत ठेवणाऱ्या भाजप-शिवसेनेच्या महायुतीला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठा दणका दिला आहे. रामदास आठवले यांनी महायुतीने जागावाटपात आपल्याशी विश्वासघात केल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला होता. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिपाईला भाजपच्या कोट्यातून जागा देण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असूनही त्यावर कार्यवाही न झाल्याने आता रामदास आठवले यांनी राजकीय बॉम्ब टाकला आहे. रामदास आठवले यांच्या रिपाईने मुंबई महानगरपालिकेसाठी 39 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. हा भाजप आणि शिंदे गटासाठी मोठा दणका मानला जात आहे.

मुंबईतील विशिष्ट भागांमध्ये रामदास आठवले यांना मानणारा आंबेडकरी समाज आहे. रामदास आठवले यांच्यामुळे हा समाज आतापर्यंत महायुतीच्या पाठिशी उभा राहिला आहे. मात्र, आता रामदास आठवले यांनी स्वतंत्रपणे रिपाईचे उमेदवार रिंगणात उतरवल्यास दलित टक्का जास्त असलेल्या मुंबईतील वॉर्डांमध्ये भाजप आणि शिंदे गटाची डोकेदुखी वाढू शकते. भाजप- शिंदे गटाने आपल्याला 7 जागा द्यायचे कबुल केले होते. मात्र, दोन्ही पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारी यादीत रिपाईच्या एकाही उमेदवाराचा समावेश नाही. त्यामुळे रिपाईने मुंबईत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे रामदास आठवले यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. महानगरपालिकेच्या निवडणुकीत 100-200 मतंही निर्णायक ठरु शकतात. त्यामुळे रामदास आठवले यांच्या रिपाईला सोबत ठेवण्यासाठी आता भाजप काय पावले उचलणार हे बघावे लागेल.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) मुंबईतील उमेदवारांची यादी

स्नेहा सिद्दार्थ कासारे- वॉर्ड क्रमांक 186
रॉबिनसन मारन नायागाम- वॉर्ड क्रमांक 188
बापूसाहेब योहान काळे- वॉर्ड क्रमांक 181
सचिनभाई मोहिते- वॉर्ड क्रमांक 200
रमेश शंकर सोनावणे- वॉर्ड क्रमांक 146
दिक्षा गायकवाड- वॉर्ड क्रमांक 152
ज्योती जेकटे- वॉर्ड क्रमांक 155
प्रज्ञा सदाफुले- वॉर्ड क्रमांक 147
संजय डोळसे- वॉर्ड क्रमांक 153
संजय इंगळे- वॉर्ड क्रमांक 154
निलीमा मानकर- वॉर्ड क्रमांक 198
गणेश वाघमारे- वॉर्ड क्रमांक 210
विनोदकुमार साहू- वॉर्ड क्रमांक 223
मनोहर कुलकर्णी- वॉर्ड क्रमांक 214
श्रावण मोरे- वॉर्ड क्रमांक 90
मनिषा संजय डोळसे- वॉर्ड क्रमांक 153
नितीन कांबळे- वॉर्ड क्रमांक 89
सचिन कासारे- वॉर्ड क्रमांक 93
विक्रांत विवेक पवार- ९८ उत्तर मध्य मुंबई
नम्रता बाळासाहेब गरुड-उत्तर मध्य मुंबई
विनोद भाऊराव जाधव-१०४- उत्तर मध्य मुंबई
रागिणी प्रभाकर कांबळे, १०३- ईशान्य मुंबई
राजेश सोमा सरकार- १२०, ईशान्य मुंबई
हेमलता सुनिल मोरे- ११८, ईशान्य मुंबई
राजेंद्र कृष्णा गांगुर्डे, १२५, ईशान्य मुंबई
भारती भागवत डोके, १३३, ईशान्य मुंबई
सतिश सिध्दार्थ चव्हाण, १४०, ईशान्य मुंबई
यशोदा शिवराज कोंडे, २८, उत्तर मुंबई
अभिजित रमेश गायकवाड, २६, उत्तर मुंबई
रेश्मा अबु खान, ५४ उत्तर मुंबई
छाया संजय खंडागळे ८१ उत्तर पश्चिम
अजित मुसा कुट्टी, ५९- उत्तर पश्चिम
जयंतीलाल वेलजी गडा, ६५- उत्तर पश्चिम
बाबू अशापा धनगर, ६३- उत्तर पश्चिम
वंदना संजय बोरोडे, ३८- उत्तर पश्चिम
राधा अशोक यादव, ३९- उत्तर पश्चिम
प्रेमलता जितेंद्र शर्मा, ४०- उत्तर पश्चिम
धनराज वैद्यनाथ रोडे,४३- उत्तर पश्चिम
शिल्पा बेलमकर- वॉर्ड क्रमांक 150

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

..अमोल बालवडकर म्हणाले भाजप नेत्यांनी धोका दिला, कार्यकर्ता काय असतो आता दाखवून देईल,धोबीपछाड करेल

अमोल बालवडकर अजितदादांच्या राष्ट्रवादीत...उमेदवारीही मिळाली. माझ्या कठीण काळात अजित...

शिवसेनेत गोंधळात गोंधळ, विजय शिवतारेंनी गोंधळ केल्याची तक्रार

रात्री १२ वाजता पत्रकार परिषद ..नंतर तीही रद्द .....

अजित पवारांचे गुंडगिरीला पाठबळ?गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी

पुणे -महापालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी...

रूपाली पाटील-ठोंबरेंना उमेदवारी;प्रभाग २६ मधून घड्याळ चालविणार

पुणे- आक्रमक महिला नेत्या अशी ओळख असलेल्या पुणे महापालिका...