AB फॉर्म बाद कसा करायचा हि पद्धत मात्र लपविली
पुणे- युती तुटली, युती तुटली अशी आरोळी महाराष्ट्रभर गाजत असताना आज दुपारी ३ वाजता अर्ज भरण्याची वेळ संपलेली असताना आणि त्यानंतरही दरवाजे बंद करून आत असलेल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करवून घेतले जात असताना पुण्यात उदय सामंत यांनी मस्त टाईमपास करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले . हॉटेल मध्ये बैठकावर बैठका आल्यावर माध्यमांशी बातचीत , पुन्हा बैठका संपल्यावर बातचीत या सर्वात त्यांनी युती आहेच .. असा धोशा कायम लावून धरला. आणि अजून ३ दिवस आहेत माघारीला तोवर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे चर्चा करून मार्ग काढतील आणि माघारीच्या दिवशी पक्षाच्या आदेशानुसार काही उमेदवार AB फॉर्म ठेवतील तेव्हा अधिकृत आम्ही किती जागा लढवतोय ते समजेल असे वक्तव्य केले आहे. पण निवडणूक अधिकाऱ्याकडे उमेदवारांनी दिलेले AB फॉर्म कसे माघारी घेण्यात येतील ते मात्र कौशल्यपूर्वक दडविले.
पहा नेमके काय म्हणाले उदय सामंत
तथापि काही जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने १५० AB फॉर्म पुण्यात दिल्याचे सांगण्यात आले आहे. या शिवाय जेव्हा फडणीस आणि शिंदे यांच्यात जागा वाटपाचा तिढा सुटेल तेव्हा म्हणजे माघारीच्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्याकडे परस्पर पक्षांचे C फॉर्म पाठविण्यात येतल ज्या द्वारे हे आमचे उमेदवार नाहीत असे कळविले जाईल आणि संबधित उमेदवाराला धनुष्यबाण , किंवा कमळ हे चिन्ह मिळणार नाही . असे असले तरी असे उमेदवार पक्षाची विनंती धुडकावून निवडणूक रणांगणात राहू शकतील .मात्र त्यांना निवडणूक आयोग देईल ते चिन्ह स्वीकारावे लागणार आहे. अवघ्या १० दिवसात ते चिन्ह घेऊन घरोघरी पोहोचविणे , कोणत्या पक्षाची युती आहे आणि आघाडी आहे, कोणाला कोणाचा पाठींबा आहे हा खेळ चालूच राहील अगदी मतदानाला जाईपर्यंत कोणता उमेदवार कोणत्या पक्षात आहे ? त्याचे चिन्ह कोणते आहे ? विरोधक कोण आहेत ? असे प्रश्न मतदारांना निश्चित बुचकळ्यात टाकू शकतील असे चित्र आहे . जाणकारांचे म्हणणे आहे कि अशा वेळी बुचकळ्यात न पडता अनेक जन NOTA चे बटन दाबतील , किंवा राष्ट्रीय पक्ष म्हणून मतदान करतील जर असे झाले तर कमळ आणि पंजा अशीच लढाई होईल

