पुणे- आक्रमक महिला नेत्या अशी ओळख असलेल्या पुणे महापालिका हद्दीत हेल्मेट सक्तीला विरोध करणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांना पुण्यातून उमेदवारी मिळालीय. प्रभाग क्रमांक २६ मधून त्या महापालिका निवडणूक लढवणार आहेत. रूपाली पाटील ठोंबरे यांनी आज सकाळी अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकरही होत्या. रूपाली पाटील आणि अजित पवारांमध्ये चर्चा झाली. यावेळी त्यांना तिकीट देण्याचा निर्णय झाला. उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी त्यांना एबी फॉर्म मिळाला.
रूपाली पाटील-ठोंबरेंना उमेदवारी;प्रभाग २६ मधून घड्याळ चालविणार
Date:

