भव्य रॅलीने जाऊन प्रमोद नाना भानगिरे यांनी उमेदवारी अर्ज भरला

Date:

म्हणाले,हडपसरच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असेल..!!

“प्रभाग क्रमांक ४१ हा माझ्यासाठी केवळ मतदारसंघ नाही, तर कुटुंब आहे. पंधरा वर्षांत या भागाचा जसा विकास केला, त्याच धर्तीवर नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचाही नियोजनबद्ध विकास करणार आहे. वाहतूक कोंडीसारख्या गंभीर प्रश्नांवर अभ्यासपूर्ण उपाययोजना करण्याची स्पष्ट ब्लूप्रिंट माझ्याकडे तयार असून, नागरिकांच्या विश्वासाच्या बळावर याही वेळी विकासाची घोडदौड कायम ठेवणार आहे.”
प्रमोद नाना भानगिरे (शिवसेना पुणे शहरप्रमुख)

पुणे, दि. २९ डिसेंबर:

शिवसेना पुणे शहरप्रमुख तथा प्रभाग क्रमांक ४१ (महादेववाडी–उंड्री) येथील शिवसेना नेते प्रमोद नाना भानगिरे यांनी आज पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी वानवडी येथील क्षेत्रीय कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज प्रचंड उत्साहात दाखल केला. यापूर्वी उंड्री येथून काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत हजारो लाडक्या बहिणी, ज्येष्ठ नागरिक व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘जय श्रीराम’च्या जयघोषात संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. हांडेवाडी रोडवरील श्रीराम चौकात प्रभू श्रीरामाची आरती करून रॅलीचा समारोप करण्यात आला.

यावेळी त्यांच्या समर्थकांनी आपल्या मनोगतात सांगितले की, प्रभाग क्रमांक ४१ मधून प्रमोद नाना भानगिरे सलग चौथ्यांदा निवडणूक लढवत असून याआधी तीन वेळा ते नगरसेवक म्हणून या भागाचे प्रतिनिधित्व करत आले आहेत. मागील पंधरा वर्षांत त्यांनी या परिसराचा सातत्याने विकास केला आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाक्या व पाईपलाईन, अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था, सांडपाण्याचे नियोजन, रस्त्यांचे मजबुतीकरण, सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण, सीसीटीव्ही यंत्रणा तसेच खेळाडूंकरिता सुविधा उभारणे अशा अनेक पायाभूत विकासकामांमुळे नागरिकांचा त्यांच्यावर विश्वास अधिक दृढ झाला आहे.हडपसरचा पूर्वीचा प्रभाग क्रमांक २६ आता प्रभाग क्रमांक ४१ म्हणून नव्याने समाविष्ट झाल्यानंतर, उपनगरातून महानगरपालिकेत आलेल्या या भागाचा नियोजनबद्ध विकास करण्यावर प्रमोद नाना भानगिरे यांनी विशेष भर दिला. वाढती लोकसंख्या लक्षात घेता वाहतूक कोंडी हा येथील प्रमुख प्रश्न असून त्यासोबत पार्किंग, सार्वजनिक वाहतूक सुलभीकरण व अंतर्गत रस्त्यांचे नियोजन ही आव्हाने आहेत. या सर्व बाबींचा अभ्यास करून टप्प्याटप्प्याने उपाययोजना करण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून नागरिकांच्या सहकार्याने तो प्रत्यक्षात उतरविण्याचा निर्धार नाना यांनी केला आहे.

आज जरी त्यांनी प्रभाग क्रमांक ४१ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला असला, तरी संपूर्ण पुणे शहरात शिवसेना संघटन बांधणीसाठी त्यांनी प्रभावी काम केले आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत याचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला प्रभागात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांच्या विकासासाठीही स्वतंत्र व स्पष्ट विकास आराखडा तयार असून, आधी समाविष्ट असलेल्या भागांप्रमाणेच त्या गावांचा सर्वांगीण विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मिळकतकराच्या भल्या मोठ्या रकमेने ‘तो’ हादरला ? अन पिस्तूल काढून म्हटलं बास आता खेळ खलास झाला..!

पुणे महापालिकेच्या भवनातला प्रकार पुणे- शासकीय,निमशासकीय संस्था हल्ली सामान्य...

नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम व्हावे – योगेश सोमण

मसाप निवडणूक'साहित्य संवर्धन आघाडी’ जाहीरनामा प्रसिद्ध पिंपरी, पुणे (दि. १३...

अभय योजनेस 15 मार्चपर्यंत मुदतवाढ, गणेश बिडकरांच्या मागणीला तत्काळ यश

पुणे (दि. १३) : महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी राबविण्यात येत...