एकनाथ शिंदे यांचा अजित पवारांना फोन, पुण्यात महायुती फुटीच्या उंबरठ्यावर…?

Date:

पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत. शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांचं शिष्टमंडळ युतीचा प्रस्ताव घेऊन अजित पवारांच्या भेटीला गेले आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, रवींद्र धंगेकर 25 ते 30 जागांचा प्रस्ताव घेऊन अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. तसेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं फोनवरही बोलणं झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपकडून सन्मानजनक जागांचा प्रस्ताव न मिळाल्यामुळे शिवसेनेकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादींचं जागावाटप पुण्याच निश्चित झालं तर महायुती इथे तुटणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात महायुतीत महापालिका निवडणुकीसाठी जागावाटपावर बैठकांचं सत्र सुरु आहे. पण अद्यापही भाजप आणि शिवसेनेचं ठरलेलं नाही. भाजपकडून सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 12 जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. पण हा प्रस्ताव शिवसेनेला अमान्य आहे. त्यामुळे शिवसेनेत नाराजीनाट्य रंगलेलं बघायला मिळालं.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर आंदोलन केलेलं बघायला मिळालं. तर नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जागावाटपाबाबत सन्मानजनक जागा मिळत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी भाजपकडे 60 जागांची मागणी केल्याचं देखील वृत्त समोर आलं होतं. तसेच पुण्यातील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्रिमंडळातील विश्वासू सहकारी असलेले उद्योग मंत्री उदय सामंत यांना महत्त्वाची जबाबदारी दिली होती.
उदय सामंत पुण्यात प्रचंड सक्रीय झाले होते. त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली होती. पण तरीही भाजप आणि शिवसेनेची युती होताना दिसत नाही. दोन्ही पक्षांचं जागावाटप ठरताना दिसलं नाही. अखेर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्यासाठी चाचपणी करत असल्याचं वृत्त समोर आलं आहे. विशेष म्हणजे तशा घडामोडी पुण्यात घडताना दिसत आहेत.एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुण्यातील बडे नेते रवींद्र धंगेकर हे आता अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे रवींद्र धंगेकर अजित पवार यांच्या भेटीला जाण्याआधी एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्यासोबत फोनवर संवाद साधळ्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यानंतर रवींद्र धंगेकर शिवसेनेच्या जागांचा प्रस्ताव घेऊन अजित पवार यांच्या भेटीला गेले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम व्हावे – योगेश सोमण

मसाप निवडणूक'साहित्य संवर्धन आघाडी’ जाहीरनामा प्रसिद्ध पिंपरी, पुणे (दि. १३...

अभय योजनेस 15 मार्चपर्यंत मुदतवाढ, गणेश बिडकरांच्या मागणीला तत्काळ यश

पुणे (दि. १३) : महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी राबविण्यात येत...

महापालिकेच्या विविध समित्यांवर सदस्यांची झाली निवड

पुणे - महापालिकेच्या मुख्य सभेत आज स्थायी समिती सदस्यांच्या...