आम आदमी पार्टीकडून प्रभाग क्र. ३८ मधून प्रशांत कांबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Date:

पुणे- महानगरपालिकेच्या निवडणुका मागील चार वर्षांपासून प्रलंबित असल्याने लोकशाहीचा उत्सव नागरिकांपासून दूर राहिला होता. आता ही निवडणूक म्हणजे लोकशाही पुनःस्थापनेचा महत्त्वाचा टप्पा असून मतदार राजाचा सन्मान जपण्याचा निर्धार आम आदमी पार्टीने केला आहे, असे मत पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत कांबळे यांनी व्यक्त केले.
लोकशाही टिकवण्यासाठी आणि पारदर्शक, जनहिताचे प्रशासन देण्याच्या उद्देशाने आम आदमी पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक ३८ — बालाजीनगर, आंबेगाव, कात्रज येथून प्रशांत कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात दाखल केला.
यावेळी कोणताही गाजावाजा न करता, नागरिकांना कुठलाही त्रास होऊ न देता हा अर्ज सादर करण्यात आला. राजकारणात प्रामाणिकपणे कार्यरत असल्यामुळे आणि लोकसेवेवर ठाम विश्वास असल्याने कुटुंबीयांनीही ठामपणे पाठीशी उभे राहत उमेदवारी अर्ज भरताना प्रशांत कांबळे यांना साथ दिली.
हा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुप्रिया करमकर तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा भुतकर, सुरेखा भणगे व नीलम शिंगाडे यांच्या उपस्थितीत स्वीकारण्यात आला.
मतदार राजाचा सन्मान राखून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेप्रमाणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या मूल्यांनुसार विकासकामे केली जातील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.
स्थानिक पातळीवरील पाणी, रस्ते, वाहतूक कोंडी, स्वच्छता, आरोग्य व इतर मूलभूत नागरी सुविधांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, असेही प्रशांत कांबळे यांनी स्पष्ट केले.
पुणे शहरात बदलाची लाट असून विजय हा नक्कीच आम आदमी पार्टीचाच होणार, असा ठाम विश्वास यावेळी प्रशांत कांबळे यांनी व्यक्त केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कर्वेनगर दुर्घटनेतील जखमी रुग्णाची महापौर मंजूषा नागपूरे यांनी दीनानाथ रुग्णालयात घेतली भेट

पुणे :कर्वेनगर येथील मेघराज सोसायटीसमोर झाडांच्या वाढलेल्या फांद्या कापण्यासाठी...

नदीपात्र खराब करणारांवर तातडीने कडक कारवाई करा – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे- पुण्याच्या नदीपात्रात कचरा , राडारोडा टाकून अगर अन्य...

तिसऱ्या तिमाहीत भारत फोर्ज ला संरक्षण क्षेत्रातील १,८७८ कोटी रूपयांच्‍या ऑर्डर्स

भारत फोर्जकडून आर्थिक वर्ष २०२६ च्‍या तिसऱ्या तिमाहीत प्रबळ...

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही प्रशासनाकडून दिरंगाई ही खूप क्लेशदायी -आ.हेमंत रासने

शहराच्या मध्यवर्ती भागातील भुयारी मार्गांचा डीपीआर तात्काळ करा! -आ.हेमंत...