पुणे-
आज २९ डिसेंबर २०२५ रोजी भारतीय जनता पक्ष,इतर मित्र पक्ष यांच्या महायुतीतर्फे प्रभाग क्रमांक 21 ड मुकुंदनगर सॅलिसबरी पार्क प्रभागातून सर्वसाधारण गटातून श्रीनाथ भिमाले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
मुख्यमंत्री माझे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, पुण्यनगरीचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री आदरणीय माधुरीताई मिसाळ,शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पुन्हा एकदा माझ्या कामांवर विश्वास ठेवत मुकुंदनगर सॅलिसबरी पार्क या प्रभागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली त्याबद्दल पक्षातील सर्व सन्माननीय वरिष्ठांचे मनःपूर्वक आभार मानेन आजवर लोकहिताच्या दृष्टीने केलेल्या कामांचा हा प्रवास या पुढील काळात देखील असाच अविरतपणे सुरू राहील. देशहित नजरेसमोर ठेवत भारतीय जनता पक्षाची पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ता आणून पुणेकरांचा सेवार्थ मी पूर्ण ताकदीनिशी कार्यरत राहील, असा विश्वास या वेळी भिमाले यांनी व्यक्त केला .

