मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले असून मुंबईत मोठे राजी-नाराजी नाट्य सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर करताना मोठी गुप्तता पाळली जात आहे. भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाने आपल्या 70 हून अधिक उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसने मुंबई महापालिकेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये, ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजे माहिम मतदारसंघातील वार्ड 192 मधून दीपक भिकाजी वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे.
काँग्रेसने अधिकृतपणे ट्विटर हँडलवरुन उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे.

