PSIपदासाठी वयोमर्यादा वाढवा : महाराष्ट्र काँग्रेसचा महायुती सरकारला थेट व अंतिम इशारा!

Date:

मुंबई | दि. २९ डिसेंबर २०२५

PSI (पोलीस उपनिरीक्षक) पदासाठी वयोमर्यादा वाढविण्याच्या मागणीसाठी हजारो उमेदवार गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र महायुती सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे, दिरंगाईमुळे आणि निर्णयक्षमता अभावामुळे आजही या अत्यंत संवेदनशील व न्याय्य मागणीवर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. परिणामी हजारो पात्र, मेहनती आणि प्रशिक्षित तरुण वयोमर्यादेबाहेर फेकले गेले असून त्यांच्या भविष्याशी थेट खेळ केला जात आहे. हा केवळ अन्याय नसून लाखो युवकांची उघड फसवणूक आहे.

PSI परीक्षेसाठी उमेदवारांनी वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, आर्थिक गुंतवणूक, शारीरिक तयारी आणि मानसिक तयारी केली आहे. PSI जाहिरात सरकारकडून तब्बल अनेक महिने उशिरा प्रसिद्ध झाली—हा दोष पूर्णपणे सरकारचा आहे. मात्र या प्रशासकीय अपयशाची शिक्षा परीक्षार्थींना दिली जात असून अवाजवी वयोमर्यादेमुळे पात्र उमेदवारांना संधी नाकारली जात आहे. हा घोर अन्याय तात्काळ थांबवला गेला पाहिजे.

महाराष्ट्र काँग्रेस पक्षाची स्पष्ट आणि ठाम मागणी आहे की PSI पदासाठी तात्काळ १ वर्ष वयोवाढीचा GR जाहीर करावा आणि वयोमर्यादेची गणना ०१ जानेवारी २०२५ प्रमाणे करण्यात यावी. आत्तापर्यंत सर्वच पक्षांच्या ९० पेक्षा अधिक लोकप्रतिनिधींनी
या मागणीसाठी सरकारकडे लेखी पत्रे सादर केली आहेत, तरीही सरकारने निर्णय घेतलेला नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे.

जर सरकारने तात्काळ निर्णय घेतला नाही, तर काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे शहरात तीव्र, व्यापक आणि रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाईल. या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी महायुती सरकारची असेल.

तरुणांचा संयम आता संपत चालला आहे. वेळेत निर्णय न घेतल्यास सरकारला याचे गंभीर राजकीय व सामाजिक परिणाम भोगावे लागतील.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कर्वेनगर दुर्घटनेतील जखमी रुग्णाची महापौर मंजूषा नागपूरे यांनी दीनानाथ रुग्णालयात घेतली भेट

पुणे :कर्वेनगर येथील मेघराज सोसायटीसमोर झाडांच्या वाढलेल्या फांद्या कापण्यासाठी...

नदीपात्र खराब करणारांवर तातडीने कडक कारवाई करा – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे- पुण्याच्या नदीपात्रात कचरा , राडारोडा टाकून अगर अन्य...

तिसऱ्या तिमाहीत भारत फोर्ज ला संरक्षण क्षेत्रातील १,८७८ कोटी रूपयांच्‍या ऑर्डर्स

भारत फोर्जकडून आर्थिक वर्ष २०२६ च्‍या तिसऱ्या तिमाहीत प्रबळ...

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही प्रशासनाकडून दिरंगाई ही खूप क्लेशदायी -आ.हेमंत रासने

शहराच्या मध्यवर्ती भागातील भुयारी मार्गांचा डीपीआर तात्काळ करा! -आ.हेमंत...