चर्चा, उत्सुकता,गोंधळ आणि शेवटी सारे काही सत्तेच्या बाकावर बसण्यासाठी,विरोधात बसण्याची तयारी काँग्रेस अन् ठाकरे सेनेसह मनसेचीच ?
अजितदादांकडून 35 च जागांवरील युती तुतारी ने स्वीकारली?
पुणे: महाविकास आघाडीला झुलवत ठेवून कधी इकडे तर कधी तिकडे पण सत्तेची वाट शोधत राजकीय गोंधळ निर्माण केलेल्या शरद पवार गटाची मागणी अजित पवार यांनी मान्य केली आहे. असे वृत्त आज येथे पसरले होते.अजित पवार यांनी पुण्यात शरद पवार यांच्या पक्षाला 32 ते 35 जागा देण्याचं कबूल केलं आहे. त्यानंतर आता दोन्ही पक्ष एकत्र लढण्यावर एकमत झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्याकडून पुणे शहरातील सर्व 165 जागांवर “सिट टू सिट” चर्चा झाल्याची माहिती आहे. उद्या दुपारपर्यंत याची अधिकृत घोषणा होईल असं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.
काँग्रेस ठाकरेंच्या शिवसेने बरोबर मनसेला,वंचित ला बरोबर घेणार ?
दरम्यान, आज पुण्यात जागावाटपाबाबत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनुपस्थितीत होते. सातत्याने संपर्क करून ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत सावध भूमिका घेताना दिसत आहेत. त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेतून बाहेर पडली आहे का? असा प्रश्नही निर्माण झाला आहे. मात्र काँग्रेस ठाकरेंच्या शिवसेने बरोबर मनसेला,वंचित ला बरोबर घेणार असल्याचे येथे सांगितले जात आहे.मात्र मनसे बाबत अजूनही काही काँग्रेस जन साशंक आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची घोषणा ते भाजपवर टीकास्त्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर कार्यक्रमात घोषणा केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार आहेत. शरद पवार यांची राष्ट्रवादी तुतारी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचं अजित पवारांनी जाहीर केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सातत्याने बैठका सुरु होत्या. या दरम्यान युतीबाबतची चर्चा फिस्कटल्याची देखील चर्चा होती. पण अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचं जाहीर झालं आहे. सध्या अजित दादांची पिंपरी चिंचवडची घोषणा केली आहे.
अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची घोषणा केली. “चिंचवडमध्ये राष्ट्रवादी पक्ष म्हणजे घड्याळ आणि तुतारी एकत्र लढत आहेत. हा परिवार पुन्हा एकत्र येत आहे. दोन्ही पक्षाने एकत्र यावे हे बऱ्याच जणांच्या मनात होतं. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी काही गोष्टी कराव्या लागत आहेत. पुढे मागे करून जागावाटप केले आहे. येणाऱ्या दोन दिवसात तुम्हाला कळेल”, अशी घोषणा अजित पवार यांनी केली. अजित पवार यांनी यावेळी आपल्या भाषणात पक्षांतर, भ्रष्टाचार आणि कायदा-सुव्यवस्थेवरून भाजपवर निशाणादेखील साधला
माझ्या २५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी कधीही फोडाफोडीचं राजकारण केलं नाही. ज्याला पक्षात यायचं असेल तो स्वखुशीनं यायचा. मात्र सध्या दमबाजी, दबाव आणि धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. हे नेमकं काय चाललं आहे?” असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे. एकेकाळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असलेली महानगर पालिका आज कर्जबाजारी झाली आहे. हे दुर्दैवी आहे”, असं अजित पवार म्हणाले.

