पुणे: भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून उमेदवारी देताना दलीत आणि मागासवर्गीय, ओबीसी वर्गावर अन्याय होत असल्याची टीका तोंडोतोंडी सुरू झाली असताना आता रिपब्लिकन कार्यकर्त्यांत देखील प्रचंड असंतोष पसरला आहे. रिपब्लिकन म्हणून भाजपा स्वतःच्या च कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन दिशाभूल करत असल्याचा आरोप करण्यात येतो आहे. केवळ वाडेकर आणि हिमाली कांबळे हे दोघेच भाजपच्या दृष्टीने रिपब्लिकन मानले जातात असे सांगितले जाते आहे.
रिपब्लिकन पार्टीमध्ये प्रचंड असंतोष
भाजपा शहर कार्यालयासमोर रिपब्लिकन कार्यकर्ते उद्या करणार धरणे आंदोलन — रिपब्लिकन पार्टीऑफ इंडिया (आठवले) या पक्षाच्या भारतीय जनता पक्षाशी युती आहे.पुणे महापालिका निवडणुकीच्या बाबतीत शहर स्तरावर जागावाटप बाबत चर्चा सुरू होती .असे सांगून रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की,तिकीट वाटपासंदर्भात बोलणी करणाऱ्या पद्मधिका-यांनी पक्षाचे पालन करून उमेदवारीसाठी पक्षाकडे मुलाखती दिल्या .बीस ते चाळीस वर्षापासून पक्षासाठी काम करणारे कार्यकर्ते वेळेला आपल्याला संधी मिळेल या आशेवर असतात . 12 ऐवजी भाजप नेत्यांनी सहा जागा सोडल्या आहेत .ज्यात मूळ रिपब्लिकन पक्षाचे लोक नाहीत .त्यामुळे पक्षातील इच्छुक कार्यकृत्यामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे त्या मुळे उमदेवार व त्यांचे पाठीराखे कार्यकर्ते यांच्यामध्ये अफवा पसरू लागल्या आहेत .या सर्व प्रक्रियेमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचे बोलले जात आहे .आमच्या पक्षाचे बोलणी करणारे प्रमुख पदाधिकारी नॉट रिचेबल आहेत .यामुळे पक्षातील कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार प्रचंड अस्वस्थ आहेत . याबाबत काही कार्यकर्ते मुंबईला आमचे नेते रामदास आठवले यांच्याकडून प्रत्यक्ष भेटून आणि फोन करून भावना व्यक्त करीत आहेत .या सर्व गोष्टीची जाणीव भारतीय जनता पक्षाला व्हावी म्हणू न उद्या सकाळी 11.30 वाजता भाजप पुणे शहर कार्यालयासमोर रिपब्लिकन पक्षाचे असंख्य कार्यकर्ते धरणे आंदोलन करणार आहेत .
या आंदोलनात जेष्ठ नेते रोहिदास गायकवाड , प्रदेश उपाध्यक्ष असित गांगुर्डे ,शहराध्यक्ष अशोक शिरोळे,माजी अध्यक्ष महेंद्र कांबळे ,राष्ट्रीय समन्वयक मंदार जोशी ,वरिष्ठ उपाध्यक्ष बाबुराव घाडगे ,वसंत बनसोडे ,शशिकांत मोरे,सुगत दसाडे ,बाळासाहेब जगताप,संदीप धंडोरे,लियाकत शेख ,सुशील सर्वगोड, रोहित कांबळे व शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार आहेत .असे जाहीर करण्यात आले आहे.

