पुणे – महापालिका निवडणूकीतील इच्छुक उमेदवारांकरीता आज राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने अर्ज भरण्याकरीता काही तज्ञ तसेच वकिल यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली , सदर ठिकाणी इच्छुकांनी अर्जावर कोठेही रिकामी जागा ठेवू नये , प्रत्येक उमेदवाराने खर्च करण्यासाठी वेगळे अकाउंट काढावे व सर्व खर्च त्यातूनच करणे अपेक्षित आहे ,सर्व आवश्यक कागदपत्रे त्वरीत तयार ठेवावीतखर्चाची मर्यादा पुणे मनपा निवडणूक १५ लाख रुपये आहे त्याचे योग्य नियोजन कसे करावे सर्व कागपत्रे 30 तारखेला दुपारीच दाखल करावीत अशाप्रकारच्या इतर अन्य सुचना ही व्यक्तिगतरित्याा दिल्या गेल्या.
सदर कार्यक्रमाचे संचलन कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी केले मारुती किंडरे व अॅड. हरीश खर्डेकर यांची टिम मदतीसाठी बारामती होस्टेल येथे आज सायंकाळ पर्यंत उपस्थित होती ८५ इच्छुकांनी आपापले अर्ज तपासून घेतले तसेच उद्या सोमवारी ही सकाळी १० .०० ते सायं ५.०० वाजेपर्यत ही सुविधा उपलब्ध असणार आहे.
उमेदवाराला मार्गदर्शनासाठी राष्ट्रवादीची टीम तैनात
Date:

