पुणे -भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा १४० वा वर्धापन दिन आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथील पवित्र वास्तुमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘भारतातील काँग्रेस पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे की, त्याला १४० वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. काँग्रेसने देशाला स्वातंत्र्याबरोबरच समानतेचा अधिकार दिलेला आहे. पं. जवाहरलाल नेहरू, लोहपुरूष वल्लभभाई पटेल, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम यासारख्या असंख्य कर्तुत्ववान नेत्यांचे विचार घेवून पक्ष खंबीरपणे वाटचाल करीत आहे. अनेक हुतात्म्यांच्या बलिदानाने व त्यागाने हा पक्ष व देश उभा राहिलेला आहे.
हाच वारसा आपल्याला पुढे घेवून पक्षाची विचारधारा जनमानसापर्यंत पोहचविण्यासाठी कटिबध्द रहावे लागेल.’’
यावेळी माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, दिप्ती चवधरी, प्रदेश खजिनदार ॲड. अभय छाजेड, प्रशांत जगताप, श्रीरंग चव्हाण, कमल व्यवहारे, अजित दरेकर, लता राजगुरू, रफिक शेख, सुनिल मलके, राज अंबिके, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, प्राची दुधाणे, सिमा सावंत, अर्चना शहा, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, सुजित यादव, प्रदिप परदेशी, गणेश गुगळे, माया डुरे, उषा राजगुरू, ॲड. राजश्री अडसुळ, ज्योती चंदवेळ, सुंदरा ओव्हाळ, अनिता धिमधिमे, ज्योती परदेशी, राजेंद्र भुतडा, सतिश पवार, राजेंद्र पडवळ, चेतन आगरवाल, ॲड. नंदलाल धिवार, वाल्मिक जगताप, कृष्णा सोनकांबळे, संतोष पाटोळे, रमेश सोनकांबळे, सद्दाम शेख, वैभव डांगमाळी, राजेश मोहिते, मगर मणियार, पुजा काटकर, सुशिल गुंजाळ, केतन ओरसे, प्रेमा पटोले आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

