पुणे-भाजपाला विरोध म्हणून सातत्याने विरोधी पक्षाची भूमिका बजावलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते मोठ्या हात घाईं ला आल्याचे चित्र या निवडणूक काळात दिसून येते आहे.अजितदादा राज्याच्या सत्तेत असल्याने…कधीकाळी याच पुतण्यावर टीकास्त्र सोडणारे तुतारीचे नेते आता अजीत् दादांच्या मांडीला मांडी लाऊन बसायला उत्सुक झाल्याचे स्पष्ट चित्र दिसले.सुरुवातीला पराभव दिसू लागताच निवडणूक लढवणार नाही अशी आरोळी ठोकली ज्यांनी ते राजकीय प्रवाहात मात्र राहिल्याचे दिसले.नंतर आणखी सहकारी पुढे आले आणि अखेरीस सत्तेच्या मोहापायी पक्ष हिताचे नाव पुढे करून दादांना मिळण्यास विरोध करणाऱ्या अध्यक्षाचा राजकीय बळी घेतला आणि नंतर अजितदादांनी झिडकारल्यावर पुन्हा माविआच्या अंगणात येऊन सन्मान पदरी पाडल्यावर ही विरोधी पक्षात बसायला नकोच हा हट्ट काही सुटेना म्हणून पडद्यामागे पुन्हा ‘गोलमाल ;झोलझाल ‘हालचाली सुरु राहिल्या.अन त्याचाच भाग म्हणून कॉंग्रेस शिवसेना,राष्ट्रवादी अशी मविआ ची आज बैठक होत असताना २ दिवस अवघे अर्ज भरायला उरले असताना या बैठकीकडे तुतारीच्या कोअर कमिटी मधील सर्वच नेत्यांनी पाठ फिरविली. काहींनी कॉंग्रेस, शिवसेना नेत्यांनी केलेले फोन घेणे देखील टाळल्याचे पुढे आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच सध्या तळ्यात मळ्यात सुरू आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जायचे की महाविकास आघाडी सोबत राहायचे अशी द्विधा मनस्थिती सध्या शरद पवार यांच्या पक्षाची झालेली आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा चर्चांना सुरुवात झाली आहे.अजित पवार यांच्यासोबत बैठक फिस्कटल्यानंतर गेल्या दोन दिवसात शरद पवार यांच्या पक्षाचे पदाधिकारी हे महाविकास आघाडीच्या बैठकीला हजेरी लावत होते. मात्र कालपासून अचानकपणे शरद पवार यांच्या पक्षातील कोणतेही पदाधिकारी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत बैठकीला उपस्थित राहत नाहीयेत.आजही महाविकास आघाडीची नियोजित बैठक होती. तरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी बैठकीला आलेले नाहीत. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेने वेगळे लढण्याची भूमिका घेतली. त्याचवेळी मनसे सोबत येते का, याचीही चाचपणी केली. तसेच यापुढे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बैठकीला बोलवायचे नाही, असा आक्रमक पवित्रा काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेने घेतला.

