पुणे :
महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी यादी जाहीर केली नसली तरी सर्वच राजकीय पक्षांच्या काही इच्छुकांनी ए-बी फॉर्मची वाट न पाहता अर्ज दाखल केले आहेत. काल २५ जणांनी अर्ज दाखल केले असून एक हजार २०६ जणांनी अर्ज विकत घेतले आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीतील जागा वाटप अद्याप निश्चित झालेले नाही. कोणाला किती जागा द्यायच्या व कोणती जागा द्यायची, यावरून प्रचंड वादावादी सुरु असून, एकमत होण्यास उशीर होत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. आज प्रभाग क्रमांक २९ एरंडवणे-हॅपी कॉलनीतून भाजपतर्फे माधुरी सहस्त्रबुद्धे, प्रभाग कल्याणीनगर-वडगावशेरीतून योगेश मुळीक, रूपाली तारळकर, प्रभाग २ फुलेनगर-नागपूरचाळीमधून शामा जाधव, प्रभाग ४ खराडी-वाघोलीमधून प्रदीप सातव, प्रभाग ७ गोखलेनगर-वाकडेवाडीतून ओंकार कदम यांनी अर्ज भरले आहेत.काँग्रेसतर्फे प्रभाग २७ नवी पेठ-पर्वतीमधून किरण मात्रे, प्रभाग १३ पुणे स्टेशन-जयजवाननगरमधून मेहमूद नदाफ तर प्रभाग ४ मधून रमेश पहऱ्हाड यांनी अर्ज भरला आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रभाग २५ शनिवार पेठ-महात्मा फुले मंडईमधून परेश खांडके, प्रभाग ३८ बालाजीनगर-आंबेगाव-कात्रजमधून वसंत मोरे यांनी अर्ज भरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रभाग ३९ अप्पर-सुपर इंदिरानगरमधून अभिलाषा घाटे, प्रभाग १३ मधून नितीन रोकडे, प्रभाग ४ मधून तेजश्री पऱ्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे प्रभाग ४ मधून प्रकाश जमधडे, विनिता जमधडे यांनी अर्ज दाखल केले आहेत. या उमेदवारांनी अर्ज भरले असले तरी ते पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत.
भाजपतर्फे माधुरी सहस्त्रबुद्धे,योगेश मुळीक यांनी ठाकरेंच्या सेनेकडून परेश खांडके वसंत मोरे यांनी अर्ज भरला
Date:

